ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली UAEमध्ये अटक, कुटुंब म्हणतेय- तिला..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 04:11 PM2023-04-17T16:11:17+5:302023-04-17T16:15:01+5:30

ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अडचणीत सापडली असून तिला UAE पोलिसांनी अटक केली आहे.

Chrisann pereira locked up in sharjah central jail on drug trafficking charges family claims she is the victi | ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली UAEमध्ये अटक, कुटुंब म्हणतेय- तिला..

ड्रग्ज तस्करी प्रकरणात बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली UAEमध्ये अटक, कुटुंब म्हणतेय- तिला..

googlenewsNext

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री क्रिसन परेराला आज कोणत्याही परिचयाची गरज  नाही. 'सडक 2' आणि 'बाटला हाऊस' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री क्रिशन परेरा अडचणीत सापडली असून तिला पोलिसांनी अटक केली आहे.  ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसनची रवानगी  शारजाह सेंट्रल तुरुंगात झाली आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीला (संयुक्त अरब अमिरात) शारजाह सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी त्याला ड्रग्जच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. कुटुंबाचे म्हणणे आहे की ते शारजाह विमानतळावर उतरल्यापासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही आणि केवळ 72 तासांनंतर त्यांना भारतीय दूतावासाने तिच्या अटकेची माहिती दिली.

 क्रिसन निर्दोष असून तिला या प्रकरणात गोवण्यात आल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. “मागील दोन आठवड्यांपासून आम्हाला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. माझी बहीण निर्दोष असून तिला ड्रग्ज रॅकेटमध्ये अडकवण्यात आलं आहे,” अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीच्या भावाने दिली आहे.

क्रिसनच्या कुटुंबीयांनी रवी नावाच्या एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. क्रिसनची आई प्रेमिला परेरा यांनी सांगितले, “क्रिसन इंटरनॅशनल वेब सीरिज करण्यासाठी तयार आहे का?” असं विचारलं होतं. त्यानंतर दुबईला ऑडिशन देण्यासाठी क्रिसनसाठी जाण्यास सांगण्यात आलं होतं. १ एप्रिलला क्रिसन दुबईसाठी निघण्याच्या पूर्वी त्या व्यक्तीने तिला मुंबई विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या एका कॉफी शॉपमध्ये भेटण्यासाठी बोलवलं होतं. त्या व्यक्तीने क्रिसनला एक ट्रॉफी देत ती ऑडिशनसाठी महत्त्वाची असल्याचं सांगितलं. त्याच ट्रॉफीत मिळालेल्या ड्रग्ज प्रकरणात क्रिसनला अटक करण्यात आल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

क्रिसनची या प्रकरणातून सुटका करण्यासाठी तिचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. त्यांनी दुबईतील वकिलाशी संपर्क साधला आहे. ज्याचा फी १३ लाख रुपये आहे. ते तिला तुरुंगातून सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 


 

Web Title: Chrisann pereira locked up in sharjah central jail on drug trafficking charges family claims she is the victi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.