कन्येच्या लग्नात चिरंजीवींचे ठुमके

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2016 19:02 IST2016-03-31T01:57:02+5:302016-03-30T19:02:17+5:30

 ६० वर्षांच्या चिरंजीवी यांनी कन्येच्या आनंदात सहभागी होत जोरदार ठुमके लावले. 

Chiranjeevi's towels at the daughter's wedding | कन्येच्या लग्नात चिरंजीवींचे ठुमके

कन्येच्या लग्नात चिरंजीवींचे ठुमके

लगू मेगास्टार चिरंजीवी यांची मुलगी श्रीजा हिचे ग्रॅण्ड मॅरेज अलीकडे पार पडले. श्रीजाने आपल्या जवळच्या मित्रासोबत लग्नगाठ बांधली. हे श्रीजाचे दुसरे लग्न आहे. बेंगळुरु येथे चिरंजीवी यांच्या फार्महाऊसवर हे ग्रॅण्ड फंक्शन पा पडले. विवाह सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण कुठले ठरले, माहितीयं? तो म्हणजे चिरंजीवी यांचा डान्स. ६० वर्षांच्या चिरंजीवी यांनी कन्येच्या आनंदात सहभागी होत जोरदार ठुमके लावले. त्यांच्याच तेलगू चित्रपटातील एका गाजलेल्या गाण्यावर मोठी मुलगी सुश्मिता स्टेजवर डान्स करीत होती. अचानक चिरंजीवी उठले आणि मुलीसोबत जॉईन झाले. या दोघांच्या डान्सने श्रीजाच्या लग्नातील माहौल एकदम आनंदी झाला. चिरंजीवीच्या या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. तो बघा आणि तुम्हीही आनंद लुटा...
{{{{twitter_video_id####}}}}


............................................

श्रीजा हिने वयाच्या १९ व्या वर्षी तिचा ब्रॉयफ्रेन्ड शिरीष भारद्वाज याच्यासोबत पहिला विवाह केजा होता. २००७ मध्ये हे लग्न झाले होते. या दोघांची एक मुलगीही आहे. मात्र हा विवाह काही वर्षच टिकला. २०११ मध्ये श्रीजा व शिरीष कायदेशीररित्या विभक्त झाले. हुंड्यासाठी शारिरीक व मानसिक छळ होत असल्याचा आरोप श्रीजाने केला होता.आता श्रीजाने पुन्हा एकदा नव्या  आयुष्याला सुरुवात करीत तिचा बालपणीचा मित्र आणि एनआरआय बिझनसमॅन कल्याण याच्यासोबत लग्न केले.
{{{{twitter_video_id####}}}}

Web Title: Chiranjeevi's towels at the daughter's wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.