आणखी एक घटस्फोट! चिरंजीवीची मुलगी श्रीजाचे दुसरं लग्नही तुटण्याच्या वाटेवर, पती कल्याणचं हटवलं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 15:50 IST2022-01-18T15:26:25+5:302022-01-18T15:50:47+5:30
श्रीजा(Sreejaने इन्स्टाग्रामवर बदललेल्या नावामुळे कल्याण(Kalyaan Dhev)पासून वेगळे होण्याच्या अफवांना उधाण आले आहे.

आणखी एक घटस्फोट! चिरंजीवीची मुलगी श्रीजाचे दुसरं लग्नही तुटण्याच्या वाटेवर, पती कल्याणचं हटवलं नाव
ऐश्वर्या-धनुष आणि नितीश भारद्वाज यांच्यानंतर आता साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी(Chiranjeevi)ची धाकटी मुलगी श्रीजा(Sreeja)ही पती कल्याण धेव(Kalyaan Dhev)पासून विभक्त झाल्याच्या बातम्या येत आहेत. श्रीजाने इन्स्टाग्रामवर बदललेल्या नावामुळे कल्याणपासून वेगळे होण्याच्या अफवांना उधाण आले आहे. मात्र, या दोघांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
श्रीजा-कल्याणचा विवाह 6 वर्षांपूर्वी झाला होता
श्रीजाने मार्च 2016 मध्ये कल्याणसोबत देवनहल्ली, बेंगळुरूजवळील कुटुंबाच्या फार्महाऊसवर लग्न केले. लग्नाला नातेवाईक, जवळचे मित्र आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनी हजेरी लावली होती. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले होते. आता तिने पतीचे नाव काढून वडिलांचे आडनाव कोनिडेला लावले आहे. जेव्हापासून ही गोष्ट समोर आली आहे, तेव्हापासून या दोघांमध्ये काय चालले आहे याची इंटरनेटवर बरीच चर्चा होत आहे.
सुपर माचीच्या प्रमोशनपासून चिरंजीवी दूर राहिले
रिपोर्ट्सनुसार चिरंजीवीचे कुटुंब कल्याणपासून वेगळे होत आहे. संक्रांतीला प्रदर्शित झालेल्या कल्याणच्या सुपर माची चित्रपटाचे प्रमोशन चिरंजीवीच्या कुटुंबाकडून करण्यात आलेले नाही. साधारणपणे, मोठ्या फॅमिली एकमेकांच्या व्यावसायिक जीवनाला खूप सपोर्ट करतात, त्यामुळे या अफवांनाही खतपाणी मिळते. मात्र, या अफवा खऱ्या आहेत की नाही, या दोन्ही कुटुंबांची अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.
कल्याणपूर्वी श्रीजाचा विवाह सिरीष भारद्वाजसोबत झाला होता. महाविद्यालयीन मित्र आणि प्रियकराशी तिचे लग्न झाले तेव्हा ती 19 वर्षांची होती. नंतर, तिचे सासरचे लोक हुंड्याची मागणी करत असल्याचा आरोप करत ती त्याच्यापासून वेगळी झाली.