सोशल मीडियावर व्हायरल झाला हा फोटो, तुम्ही यांना ओळखले का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:47 IST2020-07-01T15:45:04+5:302020-07-01T15:47:17+5:30
गेल्या दोन आठवड्यात त्याला अनेकांनी इन्स्टावर अनफॉलो केले आहे. आता त्याचे 1 कोटी 4 लाखांवर फॉलोअर्स आहेत. आधी हा आकडा 1 कोटी 10 लाखांवर होता.

सोशल मीडियावर व्हायरल झाला हा फोटो, तुम्ही यांना ओळखले का?
बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या नेपोटीझममुळे अनेक सेलिब्रेटी सध्या चर्चेचे विषय बनले आहेत. यात करण जोहर आणि आलिया भट्ट आघाडीवर आहेत. नेटीजन्स या दोघांना सध्या ट्रोल करत असून त्यांना अनफॉलोही करत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावर सतत ट्रोल होत असूनही करणने चुप्पी साधली आहे. गेल्या काही दिवसांत करणची प्रतीमा प्रचंड खराब झाली आहे. कधी काळी करणला फॉलो करणारे त्याला अनफॉलो करत आहेत.
गेल्या दोन आठवड्यात त्याला अनेकांनी इन्स्टावर अनफॉलो केले आहे. आता त्याचे 1 कोटी 4 लाखांवर फॉलोअर्स आहेत. आधी हा आकडा 1 कोटी 10 लाखांवर होता. तर आलियालाही सुमारे 1 लाखांवर लोकांनी अनफॉलो केले आहे. तसेच करण आलियाबद्दल काहीही सोशल मीडियावर दिसले की त्यावरही संताप व्यक्त केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तुर्तास करण आणि आलियाचा मॉर्फ केलेल्या या फोटोत कोणी ओळखले तर काहींनी ओलखले नाही.
तसेच गेल्या काही दिवसांपासून मेल व्हर्जन, फिमेल व्हर्जन सेलिब्रेटींचे फोटो व्हायरल होत आहे. भन्नाट फोटो पाहून सारेच हसून हसून लोटपोट होत आहेत. त्यामुळे करण आलियाचा हा फोटोदेखील अशातलाच एक प्रकार असून या फोटोवरही भन्नाट कमेटस उमटत असल्याचे पाहायला मिळत आहेत.