​ ‘चंदा मामा दूर के’साठी हिरोईन मिळेल का हिरोईन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2017 14:45 IST2017-07-14T09:15:45+5:302017-07-14T14:45:45+5:30

लवकरच सुशांत सिंह राजपूत ‘चंदा मामा दूर के’च्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे. लवकरच चित्रपटाचे शूटींग सुरु होतेय. त्यापूर्वी यातील ...

'Chanda Mama Ki Kai' will get heroine? | ​ ‘चंदा मामा दूर के’साठी हिरोईन मिळेल का हिरोईन?

​ ‘चंदा मामा दूर के’साठी हिरोईन मिळेल का हिरोईन?

करच सुशांत सिंह राजपूत ‘चंदा मामा दूर के’च्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे. लवकरच चित्रपटाचे शूटींग सुरु होतेय. त्यापूर्वी यातील अंतराळवीराच्या भूमिकेसाठी सुशांत खास ट्रेनिंग घेणार आहे. नासामध्ये हे ट्रेनिंग होणार असल्याचे कळतेय. एकंदर काय तर, चित्रपटाची अशी जय्यत तयारी सुरु आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आर. माधवन अशी स्टारकास्टही फायनल झाली आहे. पण हिरोईन कुठेय? होय, अद्यापही हिरोईनचा पत्ताच नाही. सूत्रांचे मानाल तर चित्रपटाचे निर्माते अद्यापही हिरोईनचा शोध घेत आहेत. आतल्या गोटातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी या चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींशी संपर्क साधला. मात्र अद्याप कुण्याही अभिनेत्रीने चित्रपटात रूची दाखवलेली नाही. ‘दंगल’ फेम फातिमा सना शेख हिला चित्रपटाची आॅफर दिली गेली. निधी अग्रवाल हिलाही विचारणा करण्यात आली. पण त्यांच्याकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आला नाही. तूर्तास फातिमा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहे. याऊलट निधी ‘मुन्ना मायकल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 

खरे तर या चित्रपटात हिरोईनचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. पण ही भूमिका अतिशय लहान आहे. त्यामुळे कुठलीही हिरोईन या रोलसाठी उत्सूक नाही. फातिमानेही याचमुळे चित्रपटाला नकार दिला आहे. निधीचे म्हणाल तर तिच्या नकाराचे कारण वेगळे असल्याचे कळते. होय, चित्रपटात हिरोईनचे केस लहान असणार आहे. त्यामुळे हा चित्रपट साईन करणाºया हिरोईनला आपले केस कापावे लागणार आहे. निधी यासाठी अजिबात तयार नाही. कारण तिने दुसरेही काही प्रोजेक्ट साईन केले आहेत. त्यामुळे तिनेही या चित्रपटाला नकार दिला आहे. त्यामुळे हिरोईन शोधण्याचे मोठे आव्हान निर्मात्यांसमोर ठाकले आहे.

Web Title: 'Chanda Mama Ki Kai' will get heroine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.