...या सेलेब्सचा साखरपुडा झाला; मात्र लग्नात आले विघ्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 20:16 IST2017-02-22T14:46:43+5:302017-02-22T20:16:43+5:30
बॉलिवूडमध्ये लिंकअप, ब्रेकअपच्या घटना काही नवीन नाहीत. आज एकत्र दिसणारे जोडपे उद्या एकत्र राहतीलच याची खुद्द ते जोडपेही हमी ...

...या सेलेब्सचा साखरपुडा झाला; मात्र लग्नात आले विघ्न!

करिष्मा कपूर आणि अभिषेक बच्चन
एकेकाळचे बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारे जोडपे म्हणजे अभिषेक बच्चन आणि करिष्मा कपूर हे होय. कारण त्यावेळी या दोघांची केमेस्ट्री अशी काही जुळली होती की, हे दोघेही आयुष्यभर एकत्र राहतील, असेच काहीसे दिसत होते. विशेष म्हणजे अशा काही घटना घडल्या होत्या ज्यामुळे हे दोघांचा विवाह निश्चित समजला जात होता. त्यातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून २००२ मध्ये या दोघांनी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून साखरपुडा उरकला. मात्र फेब्रुवारी २००३ पर्यंत दोघांनी अचानकच वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

अक्षय कुमार आणि रविना टंडन
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रविना टंडन यांचीही काहीशी अशीच कथा आहे. एका साप्ताहिकाला मुलाखत देताना रविनाने सांगितले होते की, तिने अक्षय कुमार याच्याबरोबर गुपचूप लग्न केले होते. मात्र या लग्नामुळे आपली लोकप्रियता कमी होईल, या भीतीने अक्षयने ही बाब कधीच समोर येऊ दिली नाही. दरम्यान, या जोडप्यामध्ये ‘खिलाडी’ या सिनेमापासून एकमेकांप्रती वितुष्ट निर्माण झाले होते. अखेर ते विभक्त झाले.

राखी सावंत आणि इलेश
आयटम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाºया राखी सावंतने तर चक्क टीव्हीवरच स्वत:च्या स्वयंवरचा घाट घातला होता. या स्वयंवरात भाग घेतलेल्या १६ स्पर्धकांपैकी इलेश नावाच्या स्पर्धकाबरोबर लग्न न करता तिने साखरपुडाही उरकून घेतला होता. मात्र येथेच पाल चुकचुकली. कारण या कार्यक्रमात राखीचा विवाह दाखविण्यात येणार होता, मात्र साखरपुडाच दाखविला गेल्याने हे नाते क्षणभंगुर असल्याचा प्रेक्षकांना अंदाज होता. अगदी ठरल्याप्रमाणे तसेच घडले, काही काळानंतर राखीने इलेशला आपल्या जीवनातून बाहेर केले.
.jpg)
मल्लिका शेरावत आणि विजय सिंह
राखी सावंतप्रमाणेच या यादीत मल्लिका शेरावत हिचाही समावेश आहे. कारण मल्लिकानेही ‘द बॅचलरेट इंडिया मेरे खयालो की मल्लिका’ या टीव्ही शोमध्ये स्वत:चे ‘स्वयंवर’ रचले होते. यामध्ये तिने विजय सिंह याची लाइफ पार्टनर म्हणून निवडही केली होती. विशेष याच कार्यक्रमात तिने विजय सिंहबरोबर साखरपुडा केला होता. मात्र पुढे वर्षभरातच त्याच्याशी सर्वप्रकारचे नाते तोडले.

विवेक ओबेरॉय आणि गुरप्रित गिल
विवेक ओबेरॉय आणि गुरप्रित गिल या जोडीनेदेखील इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर २००० मध्ये साखरपुडा केला होता. मात्र हे नाते फार काळ टिकले नाही. कारण २०१५ मध्ये विवेकने प्रियंका अल्वा हिच्याशी विवाह केला. सध्या तो इंडस्ट्रीमधून गायब असला तरी संसारात सुखी आहे.