आदित्य-श्रद्धाचे ‘रॅप अप’ सेलिब्रेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 17:27 IST2016-12-02T17:27:26+5:302016-12-02T17:27:26+5:30

बॉलिवूडची बबली गर्ल श्रद्धा कपूर ही तिच्या बिनधास्त पण क्यूट अभिनयासाठी ओळखली जाते. आव्हानात्मक भूमिका करायला तिला प्रचंड आवडतं. ...

'Up Up' Celebration of Aditya-Shastra ... | आदित्य-श्रद्धाचे ‘रॅप अप’ सेलिब्रेशन...

आदित्य-श्रद्धाचे ‘रॅप अप’ सेलिब्रेशन...

लिवूडची बबली गर्ल श्रद्धा कपूर ही तिच्या बिनधास्त पण क्यूट अभिनयासाठी ओळखली जाते. आव्हानात्मक भूमिका करायला तिला प्रचंड आवडतं. तिने रोमँटिक, अ‍ॅक्शनपट, थ्रिलर सर्व प्रकारचे चित्रपट आत्तापर्यंत केले. ‘रॉक आॅन २’ च्या माध्यमातून तिने गाणे देखील गायले. बी टाऊनच्या कलाकारामध्ये जी एक व्हर्सेटॅलिटी हवी असते ती तिच्यामध्ये निर्माण झाली आहे. 

                          

लाल रंगाचा सलवार-कमीस घातलेल्या श्रद्धा कपूरने तिच्या आगामी चित्रपट ‘ओके जानू’ चा शेवटचा सीन शूट केला आणि रात्रीच चित्रपटाची टीम, सहकलाकार आदित्य रॉय कपूरसोबत जंगी पार्टी सेलिब्रेशन केलं. शेवटचा सीन हा पूर्णपणे साँग सिक्वेन्स असून तो वैभवी मर्चंट हिने कोरिओग्राफ केला आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे उपस्थित गर्दीसह सीन शूट झाला. सेटवरच मग छान सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी आदित्य, श्रद्धा आणि शाद यांनी केक कट करून सहकारी, निर्माता यांच्यासह सेलिब्रेशन केले. 

                             

‘ओके जानू’ चित्रपटाचे विशेष हे आहे की, चित्रपटाच्या शूटिंगपासून सेटवरील फोटो आऊट करण्यात आले नाहीत. त्यामुळे चित्रपटाबद्दल विशेष उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. आता तर चित्रपटाचे शूटिंग संपले असले तरीही पोस्ट प्रोडक्शननंतरच चित्रपटाचा टीझर आऊट होईल, असे सुत्रांकडून कळतेय.

Web Title: 'Up Up' Celebration of Aditya-Shastra ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.