​शाहरूख खानच्या ‘जबरा’ फॅनने जिंकली केस; आदित्य चोप्राला द्यावी लागणार १५ हजारांची नुकसानभरपाई !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 11:23 IST2017-10-24T05:53:59+5:302017-10-24T11:23:59+5:30

शाहरूख खानचा ‘फॅन’ रिलीज होवून बरेच महिने झाले. आत्ता इतक्या महिन्यानंतर हा चित्रपट आम्हाला का आठवावा? तर यामागे एक कारण आहे. होय, कारण काय तर राज्य ग्राहक मंचाचा एक निर्णय.

Case won by Shah Rukh Khan's Jabra Fan; Aditya Chopra will pay Rs 15 thousand compensation! | ​शाहरूख खानच्या ‘जबरा’ फॅनने जिंकली केस; आदित्य चोप्राला द्यावी लागणार १५ हजारांची नुकसानभरपाई !

​शाहरूख खानच्या ‘जबरा’ फॅनने जिंकली केस; आदित्य चोप्राला द्यावी लागणार १५ हजारांची नुकसानभरपाई !

हरूख खानचा ‘फॅन’ रिलीज होवून बरेच महिने झाले. चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटला आणि शाहरूखच्या चाहत्यांची घोर निराशा झाली. आत्ता इतक्या महिन्यानंतर हा चित्रपट आम्हाला का आठवावा? तर यामागे एक कारण आहे. होय, कारण काय तर राज्य ग्राहक मंचाचा एक निर्णय. होय, हे प्रकरण आहे २०१६ सालचे. म्हणजे गतवर्षीचे. गतवर्षी शाहरूखचा ‘फॅन’ रिलीज झाला होता. महाराष्ट्राच्या औरंगाबादेतील एका २७ वर्षीय महिलेने ‘फॅन’चे ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’चे तिकिट खरेदी करत हा चित्रपट  पाहिला होता. पण  चित्रपट पाहिल्यानंतर ती थेट   ग्राहक मंचात पोहोचली होती. याठिकाणी तिने शाहरूख खान, ‘फॅन’चा दिग्दर्शक मनीष शर्मा, निर्माता आदित्य चोप्रा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.



या महिलेचे नाव आफरीन झैदी. ‘फॅन’च्या प्रोमोमधील गाणे चित्रपटात न दाखवल्याचा तिचा आरोप होता. आफरीन आणि तिची मुले शाहरूखची ‘जबरा फॅन’ आहेत. या चित्रपटाच्या प्रोमोमधील ‘जबरा फॅन’ हे गाणे पाहून आफरीन व तिच्या मुलांना कधी एकदा हा चित्रपट पाहतो असे झाले होते. प्रत्यक्षात चित्रपट पाहिला तेव्हा हे गाणेचं चित्रपटात नव्हते. आफरीन व तिची मुले केवळ हे गाणे पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. पण तेच गाणे नसल्याचे सगळ्यांचीच निराशा झाली होती आणि याच मानसिक त्रासासाठी आफरीनने जिल्हा ग्राहक मंचाचे दार ठोठावले होते.   सेन्सॉर बोर्ड, दिग्दर्शक मनीष शर्मा, अभिनेता शाहरूख खान आणि पीव्हीआर सिनेमा चित्रपटगृह यांच्याविरुद्ध  तिने ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. पण  प्रेक्षक आणि प्रतिवादी यांच्यात ग्राहक आणि सेवा देणारे असे नाते स्थापित होत नसल्याचे सांगत औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने आफरीनचा अर्ज फेटाळला होता. त्याला आफरीनने राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. 

ALSO READ: सलमान खानपाठोपाठ शाहरूख खानला सुद्धा बनायचेयं ‘आमिर खान’!

अखेर राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने आफरीनचे अपील स्वीकारले. अलीकडे याप्रकरणाचा निकाल देताना राज्य ग्राहक मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्माता आदित्य चोप्राला दोषी ठरवत आफरीनला १५ हजार रुपए नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आफरीनने ६५ हजारांची नुकसानभरपाई मागितली होती. मानसिक त्रास, तक्रारीसाठीचा खर्च, वकीलाची फी अशा सगळ्यांची नुकसानभरपाई म्हणून तिने ही रक्कम मागितली होती. पण खंडपीठाने १५ हजार नुकसानभरपाई देण्यास सांगितले. आदित्यला ६० दिवसांच्या आत ही रक्कम आफरीनलाद्यायची आहे.
 



Web Title: Case won by Shah Rukh Khan's Jabra Fan; Aditya Chopra will pay Rs 15 thousand compensation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.