Cannes 2017 : ​रेड कार्पेटवर पुन्हा दिसला सोनम कपूरचा सेक्सी अंदाज!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 11:23 IST2017-05-23T05:52:53+5:302017-05-23T11:23:51+5:30

तरूणाईच्या ‘दिलाची धडकन’असलेली सोनम कपूर हिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. आपल्या फॅशन सेन्सने सोनमने अनेकांची मने जिंकलीत. सध्या कान्स ...

Cannes 2017: Sonam Kapoor looks sexy on red carpet !! | Cannes 2017 : ​रेड कार्पेटवर पुन्हा दिसला सोनम कपूरचा सेक्सी अंदाज!!

Cannes 2017 : ​रेड कार्पेटवर पुन्हा दिसला सोनम कपूरचा सेक्सी अंदाज!!

ूणाईच्या ‘दिलाची धडकन’असलेली सोनम कपूर हिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. आपल्या फॅशन सेन्सने सोनमने अनेकांची मने जिंकलीत. सध्या कान्स फिल्म्स फेस्टिवलमध्येही सोनम हेच करतेय. सोनमच्या रेड कार्पेटवरील स्टाईलने सगळ्यांनाच वेड लावले आहे. पहिल्या दिवशी सोनम पिंक कलरच्या डिप नेक गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उतरली होती. या डिपनेक शिफॉन गाऊनमध्ये सोनम अतिशय सुंदर दिसत होती. लांब इअररिंग्स, हलका मेकअप आणि पिंक लिपस्टिक याने  तिचे सौंदर्य आणखीच खुलून आले होते. यानंतर दुस-या दिवशी सोनमने गोल्डन कलरचा गाऊन निवडला. एली साबने डिझाईन केलेल्या या गाऊनमध्ये सोनम कमालीची सुंदर दिसत होती. सोनम रेड कार्पेटवर उतरताच सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. सोनम यात इतकी ग्लॅमरस दिसत होती की, तिच्यासमोर दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय बच्चन या दोघींचाही लूक फिका पडला. 





कान्समध्ये सर्वप्रथम दीपिका रेड कार्पेटवर उतरली होती. यानंतर ऐश्वर्या राय हिने रेड कार्पेटवरील आपल्या लूकने सगळ्यांना घायाळ केले होते. ऐश्वर्यानंतर कान्सच्या रेड कार्पेटवर उतरणारी सोनम ही तिसरी भारतीय अभिनेत्री होती. कान्समध्ये सोनम, ऐश्वर्या व दीपिका या तिघींनी एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडला प्रमोट केले. 
 

कान्सच्या रेड कार्पेटवरील सोनमची स्टाईल एकदम हटके ठरली. इतकी की, सोनमचा बॉयफ्रेन्ड आनंद अहुजा हा सोनमची तारीफ करताना थकत नाहीय. सोनमचा कान्समधील एक फोटो पोस्ट करत  आनंदने त्याला ‘लव्ही’ असे सुुंदर गर्भित कॅप्शन दिले आहे. आनंदची ही प्रतिक्रिया निश्चितपणे सोनमला सुखावणारी आहे. सोनमच्या चेह-यावर हा ‘आनंद’ स्पष्ट दिसतो आहे.

Web Title: Cannes 2017: Sonam Kapoor looks sexy on red carpet !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.