Cannes 2017 : ​दीपिका, ऐश्वर्या, सोनमला विसरा... टायगर श्रॉफकडे लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2017 11:51 IST2017-05-21T06:21:10+5:302017-05-21T11:51:10+5:30

कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सगळ्यांच्या नजरा ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूरवर खिळल्या आहेत. पण आता ऐश्वर्या राय अन् सोनम ...

Cannes 2017: Forget Deepika, Aishwarya, Sonla ... Pay attention to Tiger Shroff! | Cannes 2017 : ​दीपिका, ऐश्वर्या, सोनमला विसरा... टायगर श्रॉफकडे लक्ष द्या!

Cannes 2017 : ​दीपिका, ऐश्वर्या, सोनमला विसरा... टायगर श्रॉफकडे लक्ष द्या!

न्स फिल्म फेस्टिवलमध्ये सगळ्यांच्या नजरा ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनम कपूरवर खिळल्या आहेत. पण आता ऐश्वर्या राय अन् सोनम कपूरला विसरून जरा टायगर श्रॉफकडे लक्ष द्या. होय, केवळ ऐश्वर्या, सोनम, दीपिकाच नाही तर टायगर श्रॉफ पण कान्समध्ये पोहोचला. त्याचे पहिले कान्स लूक समोर आले आहे. त्याचे हे लूक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. टायगर यात इतका स्मार्ट आणि हॅण्डसम दिसतोय, की त्याच्यावरून कुणाची नजर हटूच नये.
सिल्वेस्टर स्टेलॉनच्या ‘रँबो’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक येतोय, हे तर आम्ही तुम्हाला सांगितले आहेच. आपल्या याच चित्रपटाचे पहिले पोस्टर लॉन्च करण्यासाठी टायगर कान्सला पोहोचला आणि मग याठिकाणी त्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

{{{{twitter_post_id####}}}}


  ‘रँबो’ या ‘आयकॉनिक’ हॉलिवूडपटात सिल्वस्टर स्टेलॉन होता. आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये टायगर स्टेलॉनची जागा घेणार आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ  आनंद हा रिमेक घेऊन येणार आहे. आधी यातील लीड रोलमये सिद्धार्थ मल्होत्रा व हृतिक रोशन यांच्या नावांवर विचार झाला. पण त्यांच्यासोबत चर्चा फिस्कटली आणि ही भूमिका टायगरकडे चालून आली.



निश्चितपणे टायगर या भूमिकेसाठी कमालीचा उत्सूक आहे. मात्र मी कधीही सिल्वस्टर स्टेलॉनची जागा घेऊ शकणार नाही, असे त्याने म्हटले आहे. मार्शल आर्ट्स माझा जीव की प्राण आहे. त्यामुळे लहानपणापासून मी अ‍ॅक्शन चित्रपट पाहातच मोठा झाला आहे. ‘रँबो’च्या हिंदी रिमेकबद्दल मी कमालीचा उत्सूक आहे. पण मी सिल्वस्टरची जागा घेऊ शकेल, असे मला अजिबात वाटत नाही. मी लहानपणापासून अशाच भूमिकेसाठी स्वत:ला तयार केले आहे. त्यामुळे हा चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे, एवढेच मी म्हणेल, असे टायगर म्हणाला. येत्या फेबु्रवारीपासून या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार आहे. पुढील वर्षी हा चित्रपट आपल्या भेटीस येण्याची शक्यता आहे.

Web Title: Cannes 2017: Forget Deepika, Aishwarya, Sonla ... Pay attention to Tiger Shroff!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.