बॉर्डरवर बीएसएफ जवानांची ऐशनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 20:59 IST2016-02-26T03:59:58+5:302016-02-25T20:59:58+5:30

ऐश्वर्या रॉय बच्चन सध्या ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. लग्नानंतर ‘जज्बा’ हा तिचा पहिला चित्रपट होता. जज्बाला कसा ...

BSF jawans take a surprise visit to the border | बॉर्डरवर बीएसएफ जवानांची ऐशनी घेतली भेट

बॉर्डरवर बीएसएफ जवानांची ऐशनी घेतली भेट

्वर्या रॉय बच्चन सध्या ‘सरबजीत’ या चित्रपटासाठी खुप चर्चेत आहे. लग्नानंतर ‘जज्बा’ हा तिचा पहिला चित्रपट होता. जज्बाला कसा प्रतिसाद मिळतो यासाठी तिने खुप मेहनत घेतली होती. आणि पुन्हा आता ‘सरबजीत’ चित्रपटासाठीही ती खुपच मेहनत घेताना दिसत आहे. सरबजीतच्या बहीणीची दलबीर कौरची भूमिका ती साकारत असून त्या भूमिकेला समजून घेण्यासाठी ती वाट्टेल ते करायला तयार झाली आहे. 

नुकतीच अट्टारी बॉर्डरवर तिने भारतीय फौजेच्या बीएसएफ जवानांची भेट घेतली. त्यांच्यासोबत छानपैकी गप्पा मारल्या आणि फोटोसेशन देखील केले. 

aishwarya roy bachhan

सरबजीत सिंग हा भारतीय शेतकरी पाकिस्तानात दहशतवादी आणि गुप्तहेर म्हणून पकडला गेला होता. त्याला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. लाहोरच्या कारागृहात असताना त्याच्यावर एप्रिल २०१३ मध्ये हल्ला झाला. त्यानंतर तो काहीच दिवसांत मृत्यू पावला. सरबजीतवर आधारित ही बायोपिक त्याची बहीण दलबीर कौर हिच्यावर आधारित आहे. भावाला सोडवण्यासाठी दलबीर खुप प्रयत्न करते. ऐशने केवळ १५ मिनिटांतच ही भूमिका करायचे ठरवले. ती म्हणाली,‘ मी रोलमध्ये स्वत:ला पाहू इच्छिते.’ रणदीप हुडा सरबजीतची भूमिका साकारतो आहे. तसेच यात रिचा चढ्ढा आणि दर्शनकुमार देखील असतील. 

Web Title: BSF jawans take a surprise visit to the border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.