लीजा हेडन नव्हे तर ‘या’ हॉलिवूड ‘मॉम’नेही शेअर केलेत ब्रेस्टफिडिंगचे फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 15:46 IST2017-08-09T10:14:53+5:302017-08-09T15:46:34+5:30
सेलिब्रिटी मॉम फिगर खराब होण्याच्या भीतीने बाळाला स्तनपान करत नाही, असा एक सर्वमान्य समज आहे. पण हे सत्य आहे ...

लीजा हेडन नव्हे तर ‘या’ हॉलिवूड ‘मॉम’नेही शेअर केलेत ब्रेस्टफिडिंगचे फोटो!
स लिब्रिटी मॉम फिगर खराब होण्याच्या भीतीने बाळाला स्तनपान करत नाही, असा एक सर्वमान्य समज आहे. पण हे सत्य आहे असे मुळीच नाही. कालच बॉलिवूडची हॉट अॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्री लीजा हेडन हिने बाळाला स्तनपान करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
केवळ शेअरच केला नाही तर ‘स्तनपान सप्ताह’ साजरा करत स्तनपानाचे महत्त्वही पटवून दिले.
![]()
‘एका बाळाची आई झाल्यानंतर तुझ्या आयुष्यात काय बदलले? असा प्रश्न मला अनेकांनी विचारला. विशेषत: फिटनेस व वजनाबाबत. या ‘ब्रेस्टफीडिंग वीक’मध्ये मी याचे क्रेडिट बे्रस्टफिडिंगला देऊ इच्छिते. बाळाला जन्म दिल्यानंतर स्तनपानाने मला माझ्या शेपमध्ये परत येण्यात मोठी मदत केली. स्तनपान करणे खरोखरच कसोटीचे आणि वेळ घेणारी गोष्ट आहे. (रोज जॅकला दूध पिण्यासाठी तयार करण्यात अनेक तास जातात.) पण स्तनपान हा बाळासोबत ‘कनेक्ट’ होण्याचा एक सुंदर मार्ग आहे. शिवाय यातून बाळाला पोषणही मिळते, असे लीजाने लिहिले. स्तनपानाबद्दल जागृतता निर्माण करणारा लीजाचा हा प्रयत्न निश्चितपणे प्रशंसनीय आहे. लीजा हेडनप्रमाणेच अनेक हॉलिवूड अभिनेत्रींनीही स्तनपानाला पाठींबा देत, या मुद्यावर पुढाकार घेतला आहे.
ग्वेन स्टेफनी
![]()
सन २०१४ मध्ये हॉलिवूड सेलिब्रिटी ग्वेन स्टेफनी आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घेऊन स्वित्झर्लंड दौºयावर गेली होती. तिचा हा स्वित्झर्लंडचा दौरा चांगलाच गाजला होता. त्यामागचे कारण होते, या दौºयादरम्यान ग्वेनचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो. आल्प्स पर्वतांच्या सोबतीने ग्वेन आपल्या बाळाला स्तनपान करताना दिसली होती. सार्वजनिक ठिकाणी बाळाला स्तनपान करणे गैर नाही, हाच संदेश तिने या फोटोतून दिला होता.
एलिसा मिलानो
![]()
हॉलिवूड अभिनेत्री एलिसा मिलानो हिने गतवर्षी मुलगी एलिझाबेथ हिला स्तनपान करतानाचे चार फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ‘#WBW2016 #breastfeeding #WBWGoals #SDGs World Breastfeeding Week 2016‘ 2016’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले होते. स्तनपानाचे महत्त्व तिने यातून सांगितले होते.
जिझेल बुन्चेन
![]()
सन २०१० मध्ये आई बनलेली सुपरमॉडेल जिझेल बुन्चेन हिने बाळाला स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला होता. पण तिच्या या फोटोवर बरीच टीका झाली होती. काही मेकअपआर्टिस्ट मेकअप करत असताना जिझेल त्याचवेळी आपल्या बाळाला स्तनपान करताना या फोटोत दिसली होती. या फोटोवरून जिझेलची बरीच खिल्ली उडवली गेली होती. पण जिझेलचा यामागचा उद्देश अतिशय चांगला होता. कारण यामागे स्तनपानाबद्दल जागृत निर्माण करणे हा तिचा उद्देश होता. प्रत्येक आईने आपल्या बाळाला सहा महिन्यांपर्यंत स्तनपान करायला हवे. यासाठी एक कायदाच असायला हवा, असे ती म्हणाली होती.
मिरांडा केर
![]()
फ्लिनला (मिरांडाचा मुलगा) जन्म दिल्यानंतर दोनच आठवड्यांनी मिरांडा कामावर परतली होती. प्रसुतीच्या दोन आठवड्यातच रॅम्पवॉक करून तिने सर्वांना धक्का दिला होता. अर्थात रॅम्पवर तिला पाहून दोन आठवड्यांपूर्वी हिने एका मुलाला जन्म दिला, असे खरे वाटत नव्हते. यानंतर मिरांडाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यात तिने बे्रस्टफिडिंगबद्दल लिहिले होते. मला स्तनपान करायला आवडते. यामुळे माझी चयापचय शक्ती वाढते. मी माझ्या बाळाला दीड वर्षे स्तनपान केले, असे तिने लिहिले होते. शिवाय स्तनपान करतानाचा फोटोही शेअर केला होता.
अँजेलिना जोली
![]()
अँजेलिना जोली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही. त्यामुळे तिने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. विवियन आणि नॉक्स या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अँजेलिनाने त्यांचा एक फोटो एका लोकप्रीय मॅगझिनला अनेक कोटींमध्ये विकला होता. या फोटोत अँजेलिना बाळाला स्तनपान करताना दिसली होती. हा फोटो अँजेलिनाचा पती ब्रँड पिट याने टिपला होता. अर्थात आता अँजेलिना व ब्रँड पिट यांचा घटस्फोट झाला आहे.