'लव्हर बॉय'ची इमेज मोडत अहान पांडेचा 'अॅक्शन' अवतार, अली अब्बास जफरच्या सिनेमातील नवा लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 11:40 IST2025-10-16T11:39:46+5:302025-10-16T11:40:35+5:30
Ahan Pandey : 'सैयारा' अभिनेता अहान पांडे पुन्हा एकदा 'झेन झी'ची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. अहान पांडेने अली अब्बास जफरच्या पुढील चित्रपटातील त्याचा नवा लूक शेअर केला आहे, ज्यावर चाहते आधीच फिदा झाले आहेत.

'लव्हर बॉय'ची इमेज मोडत अहान पांडेचा 'अॅक्शन' अवतार, अली अब्बास जफरच्या सिनेमातील नवा लूक आला समोर
'सैयारा' अभिनेता अहान पांडे पुन्हा एकदा 'झेन झी'ची मनं जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. अहान पांडेने अली अब्बास जफरच्या पुढील चित्रपटातील त्याचा नवा लूक शेअर केला आहे, ज्यावर चाहते आधीच फिदा झाले आहेत. लोकांनी आतापासूनच त्याच्या लूकसाठी आणि चित्रपटासाठी तारखा 'ब्लॉक' केल्याच्या गोष्टी बोलल्या आहेत.
अहान पांडे आता त्याच्या पुढील मोठ्या प्रोजेक्टसाठी तयार दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार असून यशराज फिल्म्सचे आदित्य चोप्रा याची निर्मिती करत आहेत. भारतीय सिनेमातील सर्वात जास्त कमाई करणारी 'लव्ह-स्टोरी' ठरलेल्या 'सैयारा'च्या ऐतिहासिक यशानंतर, अहान आता त्याच्या करिअरच्या नव्या अध्यायाकडे वाटचाल करत आहे. हा चित्रपट अली अब्बास जफरची यशराज फिल्म्समध्ये घरवापसी देखील आहे. अहानने नुकताच सोशल मीडियावर त्याचा नवा लूक शेअर केला, जो 'सैयारा'मधील रोमँटिक 'लवर बॉय' लूकपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
अहानच्या या लूकवर चाहते खुश झाले आहेत. एका चाहत्याने म्हटले की, 'या हेअरस्टाईलमध्ये तू खूपच हँडसम दिसतोय.' दुसऱ्याने म्हटले, 'अहान, तू किती हँडसम दिसतोय.' आणखी एकाने म्हटले की, 'इतक्या वर्षांनंतर याला शॉर्ट हेअरमध्ये पाहतोय.' एका युजरने तर असे म्हटले की, 'तुम्हाला पाहून माझ्या हृदयाचे ठोके थांबले आहेत, हे मी कसे सांगू.' आणखी एका युजरने लिहिले- 'भाईसाब, हा मुलगा बॉलिवूडमधील सगळे रेकॉर्ड मोडणार आहे.' एका चाहत्याने म्हटले की, 'जी कोणती तारीख असेल, ती आत्तापासून बुक आहे.'
२०२६ मध्ये शूटिंगला होईल सुरूवात
'लव्ह-स्टोरी'नंतर आता ही नवी 'अॅक्शन-रोमान्स' फिल्म अहानला एका पूर्णपणे नवीन अवतारात सादर करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग २०२६ मध्ये सुरू होईल. आदित्य चोप्रा आणि अली अब्बास जफर यांच्या जोडीचा हा पाचवा चित्रपट असेल. या जोडीने यापूर्वी 'मेरे ब्रदर की दुल्हन', 'गुंडे', 'सुलतान' आणि 'टायगर जिंदा है' सारखे हिट चित्रपट दिले आहेत.