​ - म्हणून दियाच्या ‘अ‍ॅक्टिंग’ला लागला ‘ब्रेक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 20:57 IST2016-08-22T15:27:10+5:302016-08-22T20:57:10+5:30

अभिनेत्री दिया मिर्झा अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आली आणि आली तशीच गायब झाली.  अभिनेत्री म्हणून स्वत:चा ठसा उमटवण्यात दिया पुरती ...

- 'Break' for 'acting' given! | ​ - म्हणून दियाच्या ‘अ‍ॅक्टिंग’ला लागला ‘ब्रेक’!

​ - म्हणून दियाच्या ‘अ‍ॅक्टिंग’ला लागला ‘ब्रेक’!

िनेत्री दिया मिर्झा अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये आली आणि आली तशीच गायब झाली.  अभिनेत्री म्हणून स्वत:चा ठसा उमटवण्यात दिया पुरती अपयशी ठरली. अर्थात दिया स्वत: हे मानायला तयार नाहीच. तिच्या मते, मनासारख्या भूमिका न मिळाल्याने तिने अभिनयाची वाट सोडली. आताश: अभिनेत्रीऐवजी दिया एक निर्माती म्हणून ओळखली जातेय आणि यात ती आनंदी आहे. एका मुलाखतीत दियाने स्वत: हे बोलून दाखवले. ती म्हणाली, मनासारख्या कथा आणि भूमिका नाहीत, म्हणून मी अभिनय करताना दिसत नाही. एक अभिनेत्री या नात्याने विचाराल तर मी असमाधानी आहे. पण अभिनयात चांगली संधी न मिळाल्याचे दु:ख करत बसण्याऐवजी मी निर्मितीकडे वळली. निर्माता म्हणून माझ्याकडे अनेक चांगल्या कथा  आहेत. म्हणजेच एक संधी गेली तरी दुसºया संधीचे मी सोने केलेयं.

Web Title: - 'Break' for 'acting' given!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.