वीर दासची हातमिळवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 06:07 IST2016-01-16T01:05:33+5:302016-02-11T06:07:55+5:30

अमेरिकेतील सर्वात मोठय़ा मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक लेविटी एन्टरटेनमेंट ग्रुप (एलईजी)ने बॉलिवूड अँक्टर वीर दासला करारबद्ध केले आहे. 'एलईजी' कंपनीचे ...

Bravery enslavement | वीर दासची हातमिळवणी

वीर दासची हातमिळवणी

ेरिकेतील सर्वात मोठय़ा मॅनेजमेंट कंपन्यांपैकी एक लेविटी एन्टरटेनमेंट ग्रुप (एलईजी)ने बॉलिवूड अँक्टर वीर दासला करारबद्ध केले आहे. 'एलईजी' कंपनीचे लाईव्ह, निर्मिती, टॅलेंट मॅनेजमेंट आणि डिजिटल अशा चार क्षेत्रात काम चालते. जेमी फॉक्स, जेफ डनहॅम, ट्रेव्हर नोहा, डॅनिश टोश, ट्रेसी मॉर्गन, एमी शुमर आणि गॅब्रिएल इग्लेसिस यांसारख्या जगप्रसिद्ध कॉमेडियन्सचे मॅनेमेंट 'एलईजी' करते.
याबाबत उत्साहित वीर दास म्हणाला, 'जगातील एवढी मोठी कंपनी माझे करिअर सांभाळणार ही खरोखरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. जागतिक स्तरावर भारतीय कलांकारांची मागणी वाढत आहे आणि यावर्षी 'एलईजी'च्या मदतीने जगभरातील लोकांपर्यंत पोहचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.' गेल्या वर्षी वीर दासने अमेरिकेतील ब्रॉडवेच्या कॅरोलिन्स आणि हॉलिवूड इम्प्रुव्ह यांसारख्या ठिकाणी परफॉर्म केले होते. 'एलईजी'चे कॉमेडी मॅनेजर आणि प्रोड्यूसर रेग टायगरमनने सांगितले की, 'यूट्यूबर वीरचा परफॉर्मन्स पाहून आम्ही प्रभावित झालो. त्याच्यामध्ये जबरदस्त ऊर्जा आणि टॅलेंट आहे. त्यच्यासोबत काम करून त्याचे टॅलेंट जगासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल.'

Web Title: Bravery enslavement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.