Brahmastra Box Office Collection Day 8: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 10:53 IST2022-09-17T10:37:50+5:302022-09-17T10:53:58+5:30

Brahmastra Box Office Collection Day 8: रिपोर्ट्सनुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत शुक्रवारी 15 टक्क्यांनी वाढ झाली.

Brahmastra box office collection day 8 second friday 15 percent jump Ranbir Kapoor | Brahmastra Box Office Collection Day 8: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

Brahmastra Box Office Collection Day 8: रणबीर-आलियाचा 'ब्रह्मास्त्र' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जाणून घ्या आतापर्यंतच्या कमाईचा आकडा

रणबीर कपूर आणि आलिया भटच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकदा सुसाट धावू लागला आहे. चित्रपटाने दुसऱ्या वीकेंडला चांगली कमाई केली आहे. थिएटरमध्ये शुक्रवारी 'ब्रह्मास्त्र'ने डबल डिजिटची कमाई केली. 16 सप्टेंबर रोजी चित्रपटाच्या कमाईचे कलेक्शन समोर आले आहे.

'ब्रह्मास्त्र'नं कमावले इतके कोटी
पहिल्या आठवड्यात 'ब्रह्मास्त्र'ने जवळपास 174 कोटींची कमाई केली आहे. जगभरात हा आकडा 300 कोटींच्या पुढे गेला आहे. रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी 16 सप्टेंबरला 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाने 10 ते 11 कोटींची कमाई केली होती. यासह हा चित्रपट दुसऱ्या वीकेंडला २०० कोटी क्लबमध्ये एंट्री करण्यास सज्ज झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, 'ब्रह्मास्त्र'च्या कमाईत शुक्रवारी 15 टक्क्यांनी वाढ झाली. साऊथमध्येही चित्रपटाची कमाई वाढली आहे. अशा परिस्थितीत दुसऱ्या वीकेंडच्या कमाईनंतर हा चित्रपट हिट ठरेल, असे मानले जात आहे.

पहिल्या पार्टमध्ये शिवाची कहाणी आपण बघितली. दुसऱ्या पार्टमध्ये देवची (Brahmastra Part Two Dev) कथा दाखवली जाणार आहे. तुम्ही ‘ब्रह्मास्त्र’ पाहिला असेल तर याची हिंट तुम्हाला मिळाली असेलच. ‘ब्रह्मास्त्र 2’च्या पार्श्वभूमीवर अयान मुखर्जीने ‘आज तक’ला खास मुलाखत दिली.

काय म्हणाला अयान?
मी फक्त लोकांची उत्सुकता वाढवतो आहे. देव या कॅरेक्टरबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता निर्माण व्हावी, अशी माझी इच्छा आहे. देव हे कॅरेक्टर कोण साकारणार? हे मी सध्या सांगणार नाही. पण वेळ येताच मी स्वत: या नावाचा खुलासा करेल. सध्या आम्ही क्रिएटीव्ह लेव्हलवर नावांवर चर्चा करतोय. पण काही आठवड्यात मी ‘ब्रह्मास्त्र 2’च्या कामाला सुरूवात करतोय. ‘ब्रह्मास्त्र’ तयार होत असतानाच दुसऱ्या पार्टची कहाणी तयार होत होती. देव एक प्रकारे सर्व अस्त्रांच्या दुनियेचा केंद्र असेल. मला विश्वास आहे की, चित्रपटाचा दुसरा पार्टही लोकांना आवडेल. लोकांना मी यासाठी दशकभर प्रतीक्षा करायला लावणार नाही. 2025च्या डिसेंबरपर्यंत दुसरा भाग रिलीजसाठी तयार असेल, हाच माझा प्रयत्न राहिल. आता आमच्याकडे अनुभव आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर आहेत, असं अयान म्हणाला. दुसऱ्या पार्टचं शूटींग कधी सुरू होईल, याबाबत अयानने खुलासा केलेला नाही. पण त्याच्या बोलण्यावरून लवकरच या चित्रपटाची अधिकृत घोषणा होईल, असं दिसतंय. यात देवची भूमिका कोण साकारणार, हेही लवकरच कळणार आहे.

Web Title: Brahmastra box office collection day 8 second friday 15 percent jump Ranbir Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.