​बॉयफ्रेन्ड बनाले...! रणवीर सिंह पडला इलियाना डिक्रूजच्या मागे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2017 13:06 IST2017-07-11T07:33:43+5:302017-07-11T13:06:44+5:30

काही दिवसांपूर्वी वरूण धवनने सोशल मीडियावर ‘मुबारकां’तील ‘हवा हवा’ या लोकप्रीय गाण्यावर डान्स करत, एक व्हिडिओ शेअर केला होता. आता रणवीरनेही ‘मुबारकां’ प्रमोट करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Boyfriend made ...! Ranveer Singh falls behind Ileana D'cruz !! | ​बॉयफ्रेन्ड बनाले...! रणवीर सिंह पडला इलियाना डिक्रूजच्या मागे!!

​बॉयफ्रेन्ड बनाले...! रणवीर सिंह पडला इलियाना डिक्रूजच्या मागे!!

्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ या आगामी चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे आणि असू का नये, अखेर अर्जुन पहिल्यांदा काका अनिल कपूरसोबत दिसणार आहे. पुतण्या -काकाच्या या चित्रपटाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. बॉलिवूडही या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करतेय. केवळ प्रतीक्षाच नाही तर बॉलिवूड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही हिरहिरीने भाग घेतेय. विश्वास बसत नसेल तर, अर्जुनचा जिगरी यार रणवीर सिंहचा हा व्हिडिओ तुम्ही बघायलाच हवायं.



ALSO READ : रणवीर सिंहचा ‘naked’ फोटो होतोय व्हायरल !!

काही दिवसांपूर्वी  वरूण धवनने सोशल मीडियावर ‘मुबारकां’तील ‘हवा हवा’ या लोकप्रीय गाण्यावर डान्स करत, एक व्हिडिओ शेअर केला होता. आता रणवीरनेही ‘मुबारकां’ प्रमोट करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  आगळ्या-वेगळ्या अंदाजात वावरणारा रणवीर या व्हिडिओत इलियाना डिक्रूजसोबत दिसतो आहे. यात तो इलियानाला चेज करत तिला स्वत:ची गर्लफ्रेन्ड बनण्याचे प्रपोजल देतोय. इलियाना सुद्धा हे सगळे मस्तपैकी एन्जॉय करतेय. एकंदर काय तर ‘मुबारकां’ला प्रमोट  रणवीरने कुठलीही कसर सोडलेली नाही. खरे तर रणवीर सध्या ‘पद्मावती’मध्ये बिझी आहे. पण तरिही आपल्या जिगरी दोस्ताच्या चित्रपटाला अव्वल नंबर मिळवून देण्यासाठीची त्याची धडपड अपील होणारी आहे. रणवीर सिंह सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ आत्तापर्यंत ८ लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. एकंदर काय, तर ‘मुबारकां’साठी बॉलिवूड चांगलेच कामाला लागले आहे.
‘मुबारकां’मधील ‘हवा हवा’ हे गाणे अलीकडे रिलीज झाले. हे गाणे सध्या सगळ्यांच्या ओठांवर आहे. आता ‘मुबारकां’ लोकांच्या किती पसंतीत उतरतो, तेच आपल्याला पाहायचे आहे.

Web Title: Boyfriend made ...! Ranveer Singh falls behind Ileana D'cruz !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.