BOX OFFICE : ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला ‘टायगर जिंदा है’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 17:09 IST2017-12-28T11:39:16+5:302017-12-28T17:09:24+5:30

बॉक्स आॅफिसवर ‘ट्यूबलाइट’ सपशेल अपयशी ठरल्यानंतर सलमान खानच्या ‘टायगर जिंदा हैं’ने कमाईच्या बाबतीच जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. ...

Box Office: 'Bahubali' becomes the highest grossing movie 'Tiger is alive'! | BOX OFFICE : ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला ‘टायगर जिंदा है’!

BOX OFFICE : ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला ‘टायगर जिंदा है’!

क्स आॅफिसवर ‘ट्यूबलाइट’ सपशेल अपयशी ठरल्यानंतर सलमान खानच्या ‘टायगर जिंदा हैं’ने कमाईच्या बाबतीच जोरदार मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाने केवळ पाचच दिवसांत जबरदस्त कमाई करताना २०१७ या वर्षात ‘बाहुबली’नंतर सर्वाधिक कमाई करणाºया चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान मिळविले आहे. दरम्यान, ‘बाहुबली-२’ हा चित्रपट अजूनही कमाईच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. ३४.१० कोटींच्या ओपनिंगसह सलमान-कॅटरिना कैफचा हा चित्रपट अजूनही चित्रपटगृहांमध्ये आपला जलवा दाखवित आहे. भारतात हा चित्रपट ४,६०० स्क्रिनवर रिलीज करण्यात आला आहे, तर विदेशात ११०० स्क्रिनवर हा चित्रपट सुरू आहे. 

दरम्यान, आतापर्यंत समोर आलेल्या चित्रपटांचे कमाईचे आकडे ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले की, ‘टायगर जिंदा हैं’ या चित्रपटाने दोन मोठ्या सुट्यांनंतर वर्किंग डेला (मंगळवार) सर्वांत अवघड टेस्ट उत्तीर्ण झाला आहे. कारण शुक्रवारी ३४.१०, शनिवारी ३५.३०, रविवारी ४५.५३, सोमवारी ३६.५४ आणि मंगळवारी २१.६० कोटी रूपयांची कमाई करीत चित्रपटाने १७३.०७ कोटी रूपयांचा गल्ला जमविला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चित्रपटाने बुधवारीदेखील १८ कोटी रूपयांचा गल्ला जमवित, दोनशे कोटी रूपयांच्या आसपास मजल मारली आहे, तर विदेशातील कमाईसह चित्रपटाने २५० कोटी रूपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. 
 
चित्रपटाच्या यशाविषयी सलमान खानने म्हटले की, मी माझ्या चाहते आणि प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनी ‘टायगर जिंदा हैं’ला दिलेले प्रेम माझ्यासाठी मोलाचे आहे. हा चित्रपट शूट करणे संपूर्ण क्रूसाठी आव्हानात्मक होते. आम्हाला सुरुवातीला प्रचंड गर्मीत अन् नंतर थंडीमध्ये चित्रपटातील अवघड अ‍ॅक्शन सीन शूट करावे लागले. चित्रपट हा पूर्णत: मनोरंजक व्हावा याकरिता प्रत्येकाने मेहनत घेतली आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनीदेखील प्रचंड मेहनत घेतली. दरम्यान, या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल पाच वर्षांनंतर सलमान-कॅटची जोडी पडद्यावर झळकणार आहे. दरम्यान, सलमानचा हा पहिलाच असा चित्रपट आहे, ज्याने केवळ तीनच दिवसांत शंभर कोटी रूपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळविले. 

Web Title: Box Office: 'Bahubali' becomes the highest grossing movie 'Tiger is alive'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.