BOX OFFICE : अजय देवगणच्या ‘रेड’ची बॉक्स आॅफिसवर धमाल; दोन दिवसांत कमाविले इतके कोटी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 21:04 IST2018-03-18T15:34:40+5:302018-03-18T21:04:47+5:30
अभिनेता अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी (१६ मार्च) सर्वत्र प्रदर्शित झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत ...

BOX OFFICE : अजय देवगणच्या ‘रेड’ची बॉक्स आॅफिसवर धमाल; दोन दिवसांत कमाविले इतके कोटी!
अ िनेता अजय देवगणचा ‘रेड’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी (१६ मार्च) सर्वत्र प्रदर्शित झाला असून, त्यास प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी ‘बादशाहो’ आणि ‘गोलमाल अगेन’मध्ये बघावयास मिळालेला अजय देवगण पुन्हा एकदा आपल्या दमदार अंदाजात ‘रेड’मध्ये दिसत आहे. त्यामुळेच प्रेक्षकांकडून सध्या त्याचे प्रचंड कौतुक केले जात असून, त्याच्या ‘रेड’ने बॉक्स आॅफिसवर अक्षरश: खळबळ उडवून दिली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने चित्रपटाच्या दुसºया दिवसाचे बॉक्स आॅफिस कलेक्शन ट्विटच्या माध्यमातून सांगितले असून, त्यास आकडे चकीत करणारे आहेत.
तरण आदर्शनुसार, ‘रेड’ने पहिल्या दिवशी १०.०४ कोटी रूपयांची कमाई केली, तर दुसºया दिवशी बॉक्स आॅफिसवर १३.८६ कोटी रूपयांची कमाई करीत आपला दबदबा निर्माण केला. चित्रपटाने दोनच दिवसांमध्ये २३.९० कोटी रूपयांची कमाई केली आहे. या अगोदर तरण आदर्श यांनीच ट्विट करून ‘रेड’ आणि अजयचे कौतुक केले होते. एका शब्दात चित्रपटाचे समीक्षण करताना त्यांनी ‘उत्कृष्ट’ असे म्हटले होते.
दरम्यान, चित्रपट समीक्षकांनुसार, अजयचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करणार आहे. चित्रपटाने ज्या पद्धतीने पहिल्याच दिवशी कमाई केली त्यावरून हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्याची शक्यता आहे. चित्रपटाला भूषणकुमार, कृष्णकुमार, कुमार मंगत आणि अभिषेक पाठक यांनी प्रोड्युस केले आहे, तर राजकुमार गुप्ताने दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.
चित्रपटाला अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात काही जुनी गाणी रिक्रिएट केले आहेत. ज्यामध्ये ‘सानू एक पल चैन न आवे सजना तेरे बिना’ आणि ‘नित खैर मंगा सोणया में तेरी जैसे’ हे गाणे प्रेक्षकांमध्ये चांगलेच लोकप्रिय होत आहेत. या दोन्ही गाण्यांना गायक राहत फतेह अली खानने आवाज दिला आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे झाल्यास चित्रपटात अजय देवगण इनकम टॅक्स डिपार्टमेंटमधील एका प्रामाणिक अधिकाºयाच्या भूमिकेत बघावयास मिळत आहे.
चित्रपटात अजय डेप्युटी कमिशनरच्या भूमिकेत आहे, तर इलियाना डिक्रूज त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. ज्यामध्ये अजय देवगणने लखनऊमधील इनकम टॅक्स अधिकारी शरद प्रसाद पांडे यांची भूमिका साकारली आहे. शरद यांनी व्यापारी सरदार इंद्र सिंगच्या घरावर १९८१ मध्ये रेड टाकली होती. ही रेड तब्बल १८ तास चालली. यामध्ये ४५ लोक सतत पैसे मोजत होते. आतापर्यंतची सर्वांत मोठी रेड म्हणून याकडे बघितले जाते.

#Raid shows a WONDERFUL 38.04% GROWTH on Day 2... Strong word of mouth is resulting in enhanced footfalls and BO numbers... Biz on Sun should be SUPER-STRONG too... Fri 10.04 cr, Sat 13.86 cr. Total: ₹ 23.90 cr. India biz.— taran adarsh (@taran_adarsh) March 18, 2018