अर्जुनमुळे सलमानसोबत बिघडलं नातं? बोनी कपूर यांचा खुलासा; म्हणाले, "आमच्यात आता..."

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 07:30 PM2024-04-02T19:30:00+5:302024-04-02T19:30:02+5:30

अर्जुन मलायकासोबत डेटिंग करु लागल्याने त्याच्या करिअरवर परिणाम झाला का? सलमानने अर्जुनला इंड्स्ट्रीत पाठिंबा देणं बंद केलं का? अशा चर्चा असतानाच आता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत वेगळाच खुलासा केला.

Boney Kapoor reveals how if there is all well between Salman Khan Arjun Kapoor and himself | अर्जुनमुळे सलमानसोबत बिघडलं नातं? बोनी कपूर यांचा खुलासा; म्हणाले, "आमच्यात आता..."

अर्जुनमुळे सलमानसोबत बिघडलं नातं? बोनी कपूर यांचा खुलासा; म्हणाले, "आमच्यात आता..."

अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि भाईजान सलमान खान (Salman Khan) यांच्यातील नातं आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. याचं कारण म्हणजे मलायका अरोरा. मलायका सलमानचा भाऊ अरबाजला घटस्फोट देत अर्जुनला डेट करायला लागली. ही गोष्ट आता अख्ख्या इंडस्ट्रीला माहित आहे. त्यामुळे अर्जुन आणि सलमानमध्येही बिनसल्याची चर्चा आपसुकच सुरु झाली. आता यावर अर्जुनचे वडील आणि निर्माते बोनी कपूर (Bonny Kapoor) यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.

अर्जुन मलायकासोबत डेटिंग करु लागल्याने त्याच्या करिअरवर परिणाम झाला का? सलमानने अर्जुनला इंड्स्ट्रीत पाठिंबा देणं बंद केलं का? अशा चर्चा असतानाच आता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत वेगळाच खुलासा केला. सलमानमुळेच अर्जुन अभिनयात आल्याचं ते म्हणाले. न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "भलेही माझा आणि मोनाचा घटस्फोट झाला होता तरी मला हे कधीच डोक्यात आलं नाही की अर्जुनला फिल्म इंडस्ट्रीत काम करायचं आहे. तर तर सलमान खानने मला फोन करुन सांगितलं की अर्जुनला अभिनयात यायचं आहे. सलमाननेच त्याची जबाबदारी घेतली आणि त्याला वजन कमी करायला भाग पाडलं. कारण तेव्हा तो ओव्हरवेट होता. त्यामुळे अर्जुनचं सिनेमात येणं याचं श्रेय सलमानलाच जातं. आता किती जरी बोललं की त्यांच्यात काही ठीक नाही म्हणजे पहिल्यासारखं आता नातं नाही तरी सलमानने अर्जुनसाठी सर्वकाही केलं."

ते पुढे म्हणाले, "अर्जुनची आयुष्यात जी काही growth झाली त्याला सलमानच कारणीभूत आहे. मग ते अभिनय असो किंवा बॉडी बिल्डिंग असो. सलमाननेच त्याला बॉडी बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं."

अर्जुनमुळे तुमचंही सलमानसोबत नातं बिघडलं का? या प्रश्वावर बोनी कपूर म्हणाले, "माझं आजही त्याच्यावर प्रेम आहे. त्याच्यासारखे खूप कमी लोक आहेत. मोठ्या मनाचा, मृदृ स्वभावाचा आणि मला खूप आदर देणारा तो आहे.  आमच्यात काहीही बदललेलं नाही."

अर्जुन कपूर लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' मध्ये झळकणार आहे. यामध्ये तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा तरी अर्जुनला हिट मिळवून देणार का हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: Boney Kapoor reveals how if there is all well between Salman Khan Arjun Kapoor and himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.