'त्या' कोरियोग्राफरमुळे पालटलं बोमन इराणींचं नशीब, असा मिळाला होता पहिला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 04:21 PM2023-12-01T16:21:48+5:302023-12-01T16:23:53+5:30

बोमन इराणी यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनयाच्या जगतात एंट्री केली.

Boman irani birthday meeting with choreographer shiamak davar changed his life actor inspiring bollywood journey | 'त्या' कोरियोग्राफरमुळे पालटलं बोमन इराणींचं नशीब, असा मिळाला होता पहिला सिनेमा

'त्या' कोरियोग्राफरमुळे पालटलं बोमन इराणींचं नशीब, असा मिळाला होता पहिला सिनेमा

बोमन इराणी गेल्या 20 वर्षांपासून आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मनोरंजन करत आहेत. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अशी अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. बोमन इराणी यांचा 2 डिसेंबर रोजी वाढदिवस आहे.   बोमन इराणी यांनी वयाच्या ४२ व्या वर्षी अभिनयाच्या जगतात प्रवेश केला. त्याआधी ते कधी हॉटेल्समध्ये वेटर तर कधी फोटोग्राफर म्हणून काम करायचे. 

एक दिवस त्यांची ओळख कोरिओग्राफर श्यामक दावर यांच्याशी झाली. या भेटीनंतर श्यामक यांनी बोमन यांना थिएटरमध्ये काम करण्याचा सल्ला दिला आणि बोमन इराणी  थिएटरमध्ये काम करू लागले. बोमन यांनी हळू हळू थिएटरमध्ये आपली ओळख निर्माण केली. 2001 मध्ये त्यांना 'अ‍ॅव्हर्डीज सेम्स मी ललित' आणि 'लेट्स टॉक' असे दोन इंग्रजी चित्रपट मिळाले. या चित्रपटांनंतर त्यांची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. त्याने 'डर माना है' आणि 'बूम' या चित्रपटात भूमिका केल्या. पण 2003 मध्ये आलेल्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटापासून त्यांना ओळख मिळाली. या चित्रपटात त्यांनी साकारलेली डॉक्टर अस्थानाची भूमिका खूप आवडली. यानंतर 'लक्ष्या', 'वीर-जारा', 'पेज -3', 'नो एंट्री' सारख्या अनेक सिनेमे त्यांनी केले. 

थ्री इडियट्स या चित्रपटाने बोमन इराणी यांच्या कारकिर्दीला एक नवी उंची दिली. वयाच्या 42 व्या वर्षी चित्रपटांतून पदार्पण केलेल्या बोमनने आतापर्यंत 50 हून अधिक चित्रपट केले आहेत.
 

Web Title: Boman irani birthday meeting with choreographer shiamak davar changed his life actor inspiring bollywood journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.