इंटरनॅशनल रेड कापेर्टवर उतरणार बॉलिवूडची ‘मस्तानी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 14:21 IST2016-10-25T14:21:13+5:302016-10-25T14:21:13+5:30

प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये भलतीच लोकप्रीय झाली. आता दीपिका पादुकोण ही सुद्धा प्रियांकाच्या पावलावर पाऊल ठेवू पाहते आहे. याचा परिणाम ...

Bollywood's 'Mastani' to hit the International Red Caper | इंटरनॅशनल रेड कापेर्टवर उतरणार बॉलिवूडची ‘मस्तानी’!

इंटरनॅशनल रेड कापेर्टवर उतरणार बॉलिवूडची ‘मस्तानी’!

रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये भलतीच लोकप्रीय झाली. आता दीपिका पादुकोण ही सुद्धा प्रियांकाच्या पावलावर पाऊल ठेवू पाहते आहे. याचा परिणाम म्हणजे दीपिकाला एमटीव्ही अवार्ड शो होस्ट करण्याची संधी मिळाली आहे.  म्हणजेच या सोहळ्यात दीपिका अवार्ड  प्रेझेन्ट करणार आहे. येत्या ६ नोव्हेंबरला होणाºया युरोप म्युझिक अवार्ड्स सोहळ्यात दीपिका बियोंस आणि जस्टिन बीबर या दोन हॉलिवूड सुपरस्टार्ससोबत अवार्ड शो होस्ट करताना दिसेल. शिवाय या आंतरराष्ट्रीय अवार्ड शोच्या रेड कार्पेटवरही उतरेल. ही बातमी खुद्द दीपिकाने इन्टाग्रामवर आपल्या चाहत्यांशी शेअर केली आहे. मी प्रतीक्षा करू शकत नाहीय, असे तिने लिहिलेय. दीपिकाला यापूर्वी हॉलिवूडच्या प्रतिष्ठित वॅनिटी फेअर मॅगझिनच्या मुखपृष्ठावर झळकली होती.
एमटीव्ही अवार्ड शोकडे जगभरातील सिने रसिकांचे डोळे लागलेले असतात. निश्चितपणे दीपिका या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर दिसणार, म्हटल्यानंतर तिचे चाहते उत्सूक असणार. या आंतरराष्ट्रीय सोहळ्यावर दीपिकाचा लूक असा असेल, ती कुठला ड्रेस परिधान करून रेड कार्पेटवर उतरेल, याचीच आता प्रतीक्षा आहे.
यापूर्वी प्रियांका अशा अनेक आंतराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांत दिसून चुकली आहे. आॅस्कर व एमी सोहळ्या प्रियांकाची उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. दीपिकासाठी मात्र ही पहिली संधी  असेल. आता बॉलिवूडच्या या ‘मस्तानी’च्या हस्ते कुण्याला पुरस्कार मिळतो, तेही दिसणार आहेच.
दीपिकाचा पहिला वहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स: दी रिटर्न आॅफ झेंजर केज’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. यात ती हॉलिवूड स्टार विन डीजलसोबत दिसणार आहे. अलीकडे या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला.

Web Title: Bollywood's 'Mastani' to hit the International Red Caper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.