कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं ‘हे’ कपलही बांधणार लग्नगाठ, ठरला मार्चचा मुहूर्त!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 12:59 PM2022-01-04T12:59:48+5:302022-01-04T13:02:28+5:30

कतरिना कैफ व विकी कौशल यांच्यानंतर रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्न करणार, अशा चर्चा होत्या. पण रणबीर व आलियाच्या लग्नाला जरा वेळ आहे. त्याआधी बॉलिवूडचं एक मोस्ट एडोरेबल कपल लग्नबंधनात अडकणार आहे.

Bollywood wedding vibes farhan akhtar and shibani dandekar to get married in march 2022 | कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं ‘हे’ कपलही बांधणार लग्नगाठ, ठरला मार्चचा मुहूर्त!!

कतरिना व विकीनंतर बॉलिवूडचं ‘हे’ कपलही बांधणार लग्नगाठ, ठरला मार्चचा मुहूर्त!!

googlenewsNext

कतरिना कैफ व विकी कौशल यांच्यानंतर रणबीर कपूर व आलिया भटच्या लग्न करणार, अशा चर्चा होत्या. पण रणबीर व आलियाच्या लग्नाला जरा वेळ आहे. त्याआधी बॉलिवूडचं एक मोस्ट एडोरेबल कपल लग्नबंधनात अडकणार आहे. होय, आम्ही बोलतोय ते  फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर (Shibani Dandekar)  यांच्याबद्दल.

दीर्घकाळापासून हे कपल रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांनी कधीच आपलं नातं लपवलं नाही. दोन वर्षांपूर्वी फरहान  पत्नी अधुनापासून विभक्त झाला आणि यानंतर फरहान आणि शिबानी यांच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या.  दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये  ही जोडी पहिल्यांदाच एकत्र माध्यमांसमोर आली आणि पुढे सोशल मीडियावरच दोघांनीही आपआपल्या नात्याची कबुली दिली. आता हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय आणि त्यासाठी मार्च महिन्याचा मुहूर्त निवडण्यात आलाय.

‘बॉलिवूड लाईफ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत मार्च महिन्यात हे कपल ग्रँड वेडिंग करणार आहे. कोरोनाचा धोका बघता दोघांनीही अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हे लग्न होणार असल्याचं कळतंय. या लग्नासाठी एक 5 स्टार हॉटेलही बुक करण्यात आलं आहे.
लग्नात शिबानी व फरहान सब्यसाची यांनी डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये दिसणार आहेत, अशीही माहिती आहे.

शिबानी दांडेकर हे मॉडलिंग क्षेत्रातील मोठे नाव आहे.  टाइमपास  या मराठी चित्रपटात ‘साजूक तुपातली पोळी’ या गाण्यात दिसलेली शिबानी दांडेकर अभिनेत्री असण्यासोबतच गायिका आणि मॉडेल आहे.फरहान व शिबानी लव्हस्टोरी कशी सुरू झाली हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर ही लव्हस्टोरी सुरू झाली होती ती 2018 साली.होय, 2018 मध्ये शिबानीच्या आयुष्यात फरहानची एन्ट्री झाली. ‘आय कॅन डू दॅट’ या टीव्ही शोच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती.
 

Web Title: Bollywood wedding vibes farhan akhtar and shibani dandekar to get married in march 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.