Bollywood '​या' चित्रपटांनी खेळाच्या मैदानातून जागविली देशभक्ती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 15:03 IST2018-03-20T09:33:43+5:302018-03-20T15:03:43+5:30

-रवींद्र मोरे  बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून देशभक्तीला खेळांशी जोडून दाखविण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. युद्धभूमी असो वा खेळाचे मैदान ...

Bollywood 'These' films awaken patriotically from the field of play! | Bollywood '​या' चित्रपटांनी खेळाच्या मैदानातून जागविली देशभक्ती !

Bollywood '​या' चित्रपटांनी खेळाच्या मैदानातून जागविली देशभक्ती !

ong>-रवींद्र मोरे 
बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांपासून देशभक्तीला खेळांशी जोडून दाखविण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. युद्धभूमी असो वा खेळाचे मैदान असो, शत्रूंना नेस्तनाबूत होताना पाहणे दर्शकांना खूपच आवडते. म्हणूनच या श्रेणीचे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरतात. आज आपण अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्या चित्रपटातील खेळाच्या मैदानावर देशभक्ती बघावयास मिळाली.  

Related image

* चक दे इंडिया (२००७)
२००७ मध्ये रिलीज झालेला शाहरुख खानच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने तर सर्वत्र देशभक्तीचे वातावरण निर्माण केले होते. चित्रपटात शाहरुखने महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकाची भूमिका साकारली असून त्याच्या मार्गदर्शनाने भारतीय हॉकी टीम पहिल्यांदाज वर्ल्ड चँपियनशिप जिंकण्यात यशस्वी होते. या चित्रपटास एवढी प्रसिद्धी मिळाली की, यातील गाणे 'चक दे..' देशभक्तीसाठी म्हटले जाऊ लागले. त्यामुळे खेळाच्या मैदानात जेव्हा भारतीय टीम उतरते तेव्हा हे गाणे वाजणे अनिवार्यच झाले आहे. 

Image result for bhag milkha bhag

* भाग मिल्खा भाग (२०१३)
या चित्रपटात खेळ आणि भारत-पाक युद्ध या दोन्हीही मुद्यांना फोकस करण्यात आले आहे. हा चित्रपट म्हणजे ‘फ्लाइंग सिख’ या नावाने प्रसिद्ध एथलिट मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट असून ज्यातून भारत-पाक संबंधदेखील चांगल्याप्रकारे दाखविण्यात आले आहेत. चित्रपटात मिल्खा सिंह द्वारा पाकिस्तानी जमिनीवर पाकिस्तानी खेळाळूला हरविणे हा मुद्दा दर्शकांना खूपच आवडला होता.   
 
Image result for Bollywood movies based on sports

* मेरी कॉम (२०१४)
भाग मिल्खा भाग आणि चक दे इंडिया या चित्रपटाच्या यशानंतर २०१४ मध्ये भारतीय महिला मुक्केबाज व आॅलंपिक कास्य पदक विजेती मेरी कॉमच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला. यात प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटात मेरी कॉमच्या करिअरचा सुवर्ण काळ, बॉक्सिंगपासून दूरावा आणि नंतर पुनरागमन अशी सुंदर कथा दर्शविण्यात आली होती.    

Image result for Bollywood movies based on sports

* दंगल (२०१६)
'दंगल' चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सर्व रेकॉर्ड तर तोडलेच शिवाय त्यातील देशभक्तीनेही दर्शक खूप भारावले. आमिर खान आणि साक्षी तन्वरसोबत जायरा वसीम व फातिमा सना शेख यांनी चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. या चित्रपटात भारतीय दोन आंतरराष्टÑीय महिला कुस्तीपटु गीता फोगाट व बबीता फोगाट यांची कथा दर्शविण्यात आली आहे. हरियाणाच्या लहानशा गावातून बाहेर पडून वडिलांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्टÑीय खेळ जगतात आपले नाव कमविणाºया गीता व बबीताच्या या कथेस बºयाच ठिकाणी देशभक्तीचा तडका लावून दर्शविण्यात आले आहे. 

Web Title: Bollywood 'These' films awaken patriotically from the field of play!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.