वाह पठ्ठ्या...! बॉलिवूड स्टार आयुषमान खुरानावर आता यूकेमध्ये केस स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 06:57 PM2024-01-18T18:57:41+5:302024-01-18T18:58:16+5:30

Ayushmann Khurrana : लंडनमधील एक नामांकित बिहेवरियल इनसाइट्स कंपनी कॅनव्हास ८ने लोकप्रिय अभिनेता आयुषमान खुरानाच्या कामाची दखल घेतली आहे.

Bollywood star Ayushmann Khurrana now a case study in UK | वाह पठ्ठ्या...! बॉलिवूड स्टार आयुषमान खुरानावर आता यूकेमध्ये केस स्टडी

वाह पठ्ठ्या...! बॉलिवूड स्टार आयुषमान खुरानावर आता यूकेमध्ये केस स्टडी

लंडनमधील एक नामांकित बिहेवरियल इनसाइट्स कंपनी कॅनव्हास ८ने लोकप्रिय अभिनेता आयुषमान खुराना(Ayushmann Khurrana)चा भारत आणि भारतीयांमधील प्रभावावर आधारीत केस स्टडीचं आयोजन केले आहे.  ‘हाऊ अॅक्टर आयुषमान खुराना ब्रिंग्स अॅड्वोकासी इन बॉलिवूड’ असे शीर्षक असलेली ही केस स्टडी अभिनेता आपल्या देशातील लोकांचं कसं प्रतिनिधित्व करतो आणि तो सर्वात विश्वासू आणि भारतीय व्यक्तिमत्व आहे, यावर लक्ष केंद्रीत करतो.

या केस स्टडीमध्ये अभिनेत्याच्या प्रभावाबद्दल सांगण्यात आले आहे की, “फॉर्म्युलाबद्ध चित्रपटांसाठी ओळखल्या जाणार्‍या लोकप्रिय सिने जगतात, खुरानाचा बॉलिवूड स्टारडमपर्यंतचा प्रवास काही सोप्पा नव्हता. खुरानाच्या प्रवासातील महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘आव्हानात्मक’ चित्रपट करण्याची त्याची निवड. त्याने ड्रीम गर्ल चित्रपटामध्ये क्रॉस-जेंडर अभिनेता, डॉक्टर जी मधील पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञ विद्यार्थी आणि विकी डोनरमध्ये नियमित शुक्राणूदाताची भूमिका केली होती. ज्या चित्रपटांना इतरांनी नाकारले होते किंवा विचाराही केला नव्हता. आयुषमान हा ‘जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती’ म्हणून दोन वेळा टाइम मॅगझिन पुरस्कार विजेता आहे.

आयुषमानची ख्याती सातत्याने वाढतेय

केस स्टडीने भारताचा ‘ग्रासरूट रिप्रेझेंटेशन द्वारे वाढणारा प्रभाव’ सादर केल्याबद्दल आयुषमानचे कौतुक केले आहे. आयुषमानची ख्याती सातत्याने वाढत आहे, २०२० मध्ये टाइम मॅगझिनने जगातील १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांचे नाव घेतले आहे. युनिसेफसाठी त्यांच्या बालहक्क सक्रियतेमुळे त्यांना २०२३ मध्ये टाईम १०० प्रभाव पुरस्कार मिळाला. यापैकी त्याच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीत त्याचे असंख्य चित्रपट प्रशंशनीय आहेत, ज्याचे श्रेय तो समाजात खोलवर रुजलेल्या त्याच्या पात्रांना देतो.

आयुषमान खुरानामुळे भारतीयांचा सामाजिक वास्तववादी गोष्टींकडे कल वाढत गेला, यावरही केस स्टडी प्रकाश टाकते! केस स्टडी पुढे सांगते की, भारतीय प्रेक्षक काहीसे अपरंपरागत असलेल्या पात्रांना अधिक ग्रहणक्षम बनले आहेत. यामुळे भारतीय चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे, मुख्य प्रवाहातील चित्रपट निर्मात्यांना विश्वास आहे की ही महामारी नंतरची टेस्ट येत्या काही वर्षांतच अधिक स्पष्ट होईल. पण २०२३ मध्ये खुरानाच्या ड्रीम गर्ल २ च्या यशामध्ये अधिक वास्तववादी आणि विचार करायला लावणार्‍या आशयाकडे वळणे आधीच पाहिले जाऊ शकते, जी यशस्वीरित्या १०० कोटी क्लबचा भाग बनली आहे.
 

Web Title: Bollywood star Ayushmann Khurrana now a case study in UK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.