बादशाहने खरेदी केली आलिशान Rolls Royce, कोटींमध्ये आहे किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 14:30 IST2025-09-30T14:29:48+5:302025-09-30T14:30:47+5:30
बादशाह आलिशान लाइफ जगतो. त्याच्याकडे लक्झरियस गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये आता आणखी एका कारची भर पडली आहे. बादशाहने नुकतीच नवी कोरी Rolls Royce खरेदी केली आहे.

बादशाहने खरेदी केली आलिशान Rolls Royce, कोटींमध्ये आहे किंमत
बाहशाह हा बॉलिवूडमधला लोकप्रिय सिंगर आहे. त्याची अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. जसा त्याचा थाट आहे तसाच तो महागड्या गोष्टींचा शौकीन आहे. बादशाह आलिशान लाइफ जगतो. त्याच्याकडे लक्झरियस गाड्यांचं कलेक्शन आहे. यामध्ये आता आणखी एका कारची भर पडली आहे. बादशाहने नुकतीच नवी कोरी Rolls Royce खरेदी केली आहे.
आपल्या नव्या कारची झलक बादशहाने व्हिडीओतून दाखवली आहे. इन्स्टाग्रामवर बादशहाने त्याच्या नव्या Rolls Royce कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. या कारवर त्याचं नावंही लिहिलं असल्याचं दिसत आहे. 'झेन वाले लडके' असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. बादशहाने खरेदी केलेल्या Rolls Royceची किंमत तब्बल १२.४५ कोटी इतकी आहे. बादशाहच्या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटी आणि चाहत्यांनीही त्याचं अभिनंदन केलं आहे.
बादशाहकडे Rolls Royce कंपनीची व्रेथ ही ५ कोटींची गाडीदेखील आहे. याशिवाय त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी उरूस (४.१८ कोटी), पोर्श केमैन (३ कोटी), ऑडी क्यू८ (१.५ कोटी), मर्सिडीज बेंझ एस क्लास आणि मर्सिडीज जीएलएस ३५० डी, बीएमडब्ल्यू या महागड्या गाड्याही आहेत.