अब और नहीं सह सकता...!  अरमान मलिकने डिलीट केल्या सर्व पोस्ट, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 01:54 PM2020-03-11T13:54:13+5:302020-03-11T13:56:35+5:30

अरमानला अचानक झाले तरी काय?

bollywood singer armaan malik deleted his all post from instagram write can not take it anymore-ram | अब और नहीं सह सकता...!  अरमान मलिकने डिलीट केल्या सर्व पोस्ट, काय आहे कारण?

अब और नहीं सह सकता...!  अरमान मलिकने डिलीट केल्या सर्व पोस्ट, काय आहे कारण?

googlenewsNext
ठळक मुद्देअरमान मलिक बॉलिवूडचा लोकप्रिय सिंगर आहे. मैं रहूं या न रहूं, बोल दोन ना जरा, वजह तुम हो अशी लोकप्रिय गाणी त्याने गायली आहेत.

 बोल दो ना जरा, हुआ हैं आज पहली बार, सब तेरा , वजह तुम हो  यासारखे अनेक सुपरहिट रोमँटिक आणि पार्टी साँग गाणारा बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अरमान मलिक सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह दिसतो. फॅन्ससोबतचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असतो. पण अचानक अरमानने इन्स्टाग्रामवरच्या सगळ्या पोस्ट डिलीट केल्यात आणि फॅन्सला धक्का बसला.
होय, आय कान्ट टेक इट एनीमोअर, (आता आणखी सहन करू शकत नाही)अशी एक ओळ लिहिलेला फोटो त्याने शेअर केला. पण त्यापूर्वी इन्स्टावरच्या सर्व पोस्ट डिलीट केला. इतकेच नाही तर डीपी सुद्धा ब्लॅक केला. एकाचवेळी इतक्या सगळ्या निगेटीव्ह गोष्टी पाहून साहजिकच अरमानला अचानक झाले तरी काय?  असा प्रश्न चाहत्यांना पडला.


अरमानच्या या पोस्टनंतर वेगवेगळे  तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या मते, अरमान डिप्रेशनमध्ये आहे. तर काहींच्या मते, त्याचे इन्स्टा अकाऊंट हॅक झालेय. कारण अरमानच्या फेसबुक अकाऊंटवर सगळे काही नॉर्मल आहे.

याआधीही अरमानने अशीच पोस्ट लिहिली होती. गतवर्षी मार्च महिन्यात जगप्रसिद्ध सिंगर जस्टिन बीबरने आयुष्यातील एकटेपणा सतावत असल्याची पोस्ट टाकली होती.

यावर कमेंट करताना, ‘असे वाटणारा मी एकटा नाही, आता पटलेय. तुम्ही आणि तुमच्या अवतीभवतीचे लोकही रोजच्या आयुष्यातून यातून जातात. ज्याबद्दल बोलणे आपण टाळतो,’ असे अरमान मलिकने लिहिले होते.
अरमान मलिक बॉलिवूडचा लोकप्रिय सिंगर आहे. मैं रहूं या न रहूं, बोल दोन ना जरा, वजह तुम हो अशी लोकप्रिय गाणी त्याने गायली आहेत.

Web Title: bollywood singer armaan malik deleted his all post from instagram write can not take it anymore-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.