"मुलीच्या रुपात आईनेच जन्म घेतला...", बॉलिवूड सिंगर झाला बाबा, दाखवली बाळाची झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:35 IST2025-11-17T13:34:49+5:302025-11-17T13:35:17+5:30
गायकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून घरात लक्ष्मी आली आहे. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज गायकाने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

"मुलीच्या रुपात आईनेच जन्म घेतला...", बॉलिवूड सिंगर झाला बाबा, दाखवली बाळाची झलक
गेल्या काही दिवसांत बॉलिवूडमधून अनेक गुडन्यूज आल्या आहेत. कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा, विकी कौशल-कतरिना कैफ आणि राजकुमार राव-पत्रलेखा हे आईबाबा झाले. आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल आईबाबा झालं आहे. लोकप्रिय बॉलिवूड सिंगरच्या घरी पाळणा हलला आहे. गायकाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं असून घरात लक्ष्मी आली आहे. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज गायकाने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
बॉलिवूड गायक अखिल सचदेव बाबा झाला आहे. अखिलची पत्नी तान्या हिने ६ नोव्हेंबरला त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांना कन्यारत्न झालं आहे. अखिलने फोटो शेअर करत बाळाची झलकही दाखवली आहे. "६ नोव्हेंबर २०२५... आमची छोटी जादू आली आहे... आम्हाला कन्यारत्न झालं आहे. माझ्या मुलीच्या रुपात माझ्या आईनेच जन्म घेतला आहे", असं म्हणत अखिलने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनीही त्याचं अभिनंदन केलं आहे.
अखिल सचदेव हा बॉलिवूडमधील लोकप्रिय गायक आहे. त्याने अनेक बॉलिवूड सिनेमांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. बद्रिनाथ की दुल्हनिया सिनेमातील हमसफर गाण्याने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अखिलचं हे गाणं हिट ठरलं होतं. याशिवाय त्याची तेरा बन जाऊंगा, चन्ना वे, गलिया, दुआ बन जा ही गाणी लोकप्रिय ठरली आहे.