रिव्हिलिंग स्कर्टमुळे अशी झाली राखीची अवस्था, जॉनी लिव्हरला पाहताच लपवू लागली कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:53 IST2022-04-07T14:52:04+5:302022-04-07T14:53:05+5:30
RRRच्या या पार्टीत राखी सावंत आणि जॉनी लिव्हर यांना एकत्र पाहणे सर्वांसाठीच आनंददाची गोष्ट होती. या दोघांचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

रिव्हिलिंग स्कर्टमुळे अशी झाली राखीची अवस्था, जॉनी लिव्हरला पाहताच लपवू लागली कट
एसएस राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटाने जगभरात 1000 कोटी रुपयांची कमाई करून नवा विक्रम केला आहे. RRR चे दिग्दर्शक आणि स्टारकास्ट यांनी या चित्रपटासाठी जबरदस्त काम केले आहे. चित्रपटाच्या यशानंतर एका सक्सेस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीसाठी बॉलिवूडचे अनेक स्टार्स मंडळी पोहोचले होते. पार्टीत आमिर खान, जॉनी लीव्हर आणि ड्रामा क्वीन राखी सावंतही दिसून आली.
...जेव्हा कॉमेडीच्या बादशाहला भेटली राखी -
90 च्या दशकात आपल्या कॉमेडीच्या माध्यमांतून चित्रपट प्रेमिंचे मनोरंजन करणारे अॅक्टर जॉनी लिव्हरही RRR च्या पार्टीची शोभा वाढवताना दिसून आले. यावेळी तेथे राखी सावंतदेखील उपस्थित होती. या दोन्ही स्टार्सना पाहिल्यानंतर, पेपराजीसह सर्वांचेच कॅमेरे राखी सावंत आणि जॉनी लिव्हर यांच्याकडे वळले.
RRRच्या या पार्टीत राखी सावंत आणि जॉनी लिव्हर यांना एकत्र पाहणे सर्वांसाठीच आनंददाची गोष्ट होती. या दोघांचा व्हिडिओही सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते. ती म्हणजे, जॉनी लीव्हरला भेटताना राखी तिचा स्टार्क व्यवस्थित करताना दिसत आहे. पार्टीत राखी बिंधास्त अंदाजात दुसून आली. पण, जॉनी लीव्हर समोर येताच तिने स्कर्टचा डीप कट लपवायला सुरुवात केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यावेळी जॉनी लीव्हरही राखीच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवताना दिसला. जॉनी लीव्हरसोबतच राखीने आमिर खानसोबतही पोज दिली. आता सांगा, राखी सावंत, जॉनी लीव्हर आणि आमिर खान यांना एकत्र पाहून आपल्याला काय वाटले. कारण असे क्षण वारंवार येत नाहीत...