नाद नडला! तो बॉलिवूडचा स्टार हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकला, डिटेक्टिव्हचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:11 IST2025-11-07T14:10:10+5:302025-11-07T14:11:19+5:30
वान-नाईट स्टँडनंतर बिंग फुटलं, बॉलिवूडचा स्टार अभिनेता निघाला Gay, डिटेक्टिव्हचा मोठा खुलासा

नाद नडला! तो बॉलिवूडचा स्टार हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकला, डिटेक्टिव्हचा खुलासा
प्रायव्हेट डिटेक्टिव्ह तान्या पुरी सध्या चर्चेत आहे. टॉप स्टार्सचे विवाहबाह्य संबंध, एस्कॉर्ट सेवा देणारी बॉलिवूड अभिनेत्री अशा अनेक बॉलिवूडच्या पडद्यामागे सुरू असलेल्या गुपित घटनांचा धक्कादायक खुलासा तिनं केलाय. आता तिने एका प्रसिद्ध तरुण बॉलिवूड अभिनेत्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे, जो समलैंगिक आहे आणि त्याला एका तरुणीने ब्लॅकमेल केले होते.
सिद्धार्थ कन्नन यांच्याशी संवाद साधताना, तान्या पुरीनं मनोरंजन उद्योगातील ब्लॅकमेलिंगच्या प्रकरणांवर भाष्य केले. तान्या पुरी म्हणाली, "इंडस्ट्रीमध्ये ब्लॅकमेलिंग सर्रास सुरू आहे. आमच्याकडे एक केस आली होती, जिथे एका तरुण अभिनेत्याला ब्लॅकमेल केले जात होते, जो प्रत्यक्षात समलैंगिक (Homosexual) होता आणि त्याने हे सत्य कोणालाही उघड केले नव्हते".
'वन-नाईट स्टँड' ठरले ब्लॅकमेलिंगचे कारण
हा तरुण अभिनेता नेमका कसा अडकला, याबद्दल तान्या पुरीनं सविस्तर माहिती दिली. तान्या म्हणाली, "या अभिनेत्याने एका क्लबमध्ये एका मुलीसोबत 'वन-नाईट स्टँड' केले होते. त्या मुलीला कळालं की तो समलैंगिक आहे आणि तिला त्याच्यात रस नाही. तेव्हा तिने संधी साधली. तिने 'वन-नाईट स्टँड'चे पुरावे घेतले आणि त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तिने त्याला पैशासाठी ब्लॅकमेल केले आणि धमकी दिली की, 'जर तू मलापुरेसे पैसे दिले नाहीस, तर मी हे सत्य जगासमोर उघड करेन आणि तुझे करिअर संपवेन".
अखेर अभिनेता कसा सुटला?
हा अभिनेता या गंभीर परिस्थितीतून कसा बाहेर पडला, हे देखील तान्याने सांगितले. ती म्हणाली,"तो अभिनेता पूर्णपणे अडकला होता, म्हणून त्याच्या टीमने आमच्याशी संपर्क साधला. त्या मुलीबद्दल अभिनेत्याला आणखी माहिती हवी होती आणि त्याला जाणून घ्यायचं होतं की, ती असं का करत आहे? खरे तर असे प्रकरण हाताळण्यासाठी अनेक महिने लागतात. अखेर, कोणतेच पुरावे उघड झाले नाहीत. एक तोडगा निघाला. मुलीविरुद्ध पुरावे असल्याने तिला कोणतेही पैसे देण्यात आले नाहीत आणि यामुळे अभिनेत्याला मदत झाली. अखेर, त्यांनी वाटाघाटी करण्यास सहमती दर्शवली. ज्यामुळे अभिनेत्याचे सत्य बाहेर आले नाही". तान्या पुरीच्या या खुलाशामुळे बॉलिवूडच्या पडद्यामागील आणखी एक धक्कादायक बाजू समोर आली आहे.