Bollywood : ‘या’ दिग्गज स्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केली बॉलिवूड एन्ट्री !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2018 17:32 IST2018-03-17T12:02:45+5:302018-03-17T17:32:45+5:30
-रवींद्र मोरे बॉलिवूड अॅक्टर्सची लाइफस्टाइल आणि प्रसिद्धी पाहता सर्वांना वाटते की, या स्टार्सचे आयुष्य किती मजेदार असते. मात्र त्यांच्या ...

Bollywood : ‘या’ दिग्गज स्टार्सनी घरच्यांच्या विरोधात जाऊन केली बॉलिवूड एन्ट्री !
बॉलिवूड अॅक्टर्सची लाइफस्टाइल आणि प्रसिद्धी पाहता सर्वांना वाटते की, या स्टार्सचे आयुष्य किती मजेदार असते. मात्र त्यांच्या सुखद आयुष्याच्या मागे किती मोठा संघर्ष लपलेला असतो, हे प्रत्येकाला माहित नसते. चित्रपटात भूमिका मिळण्यासाठीच्या संघर्षा अगोदरचाही एक संघर्ष म्हणजे घरच्यांची परवानगी मिळविणे होय. आज बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांना सुरुवातीला घरच्यांचा तीव्र विरोध होता, मात्र या स्टार्सनी या विरोधास न जुमानता बॉलिवूड एन्ट्री केली आणि आज दिग्गज स्टार म्हणून प्रसिद्धी मिळविली. जाणून घेऊया त्या स्टार्सबाबत...

* कंगना राणौत
आज बॉलिवूडमध्ये कंगना त्या निवडक अभिनेत्र्यांमधली एक आहे, जी एकटीच्या जोरावर चित्रपट हिट करु शकते. कंगनाने सतत बॉलिवूडचे दिग्गज सुपरस्टार शाहरुख, सलमान आणि आमिर यांना चॅलेंज केले आहे. मात्र जेव्हा कंगनाने पहिल्यांदा आपल्या घरी अॅक्टिंग करिअरबाबत सांगितले होते तेव्हा तिचे वडील खूपच रागावले होते. सुरुवातील तिने घरी सांगितले नव्हते की, ती चित्रपटात काम करत आहे. त्यांना हेच माहित होते की, कंगना मुंबईत शिक्षण घेत आहे.

* आयशा झुल्का
'जो जीता वही सिकंदर' आणि 'खिलाड़ी' सारख्या सुपरहिट चित्रपटात काम करणारी अभिनेत्री आयशा झुल्काने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिने घरी चित्रपटांत काम करण्यासंदर्भात विचारले होते तेव्हा तिच्या घरच्यांनी स्पष्ट नकार दिला होता. तिच्या घरच्यांचे म्हणणे होते की, बॉलिवूडमध्ये चांगल्या मुली जात नाहीत आणि चित्रपटात काम केल्याने समाजात तिला चुकीचे मानले जाईल.

* आमिर खान
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानलाही घरच्यांचा चित्रपटात काम करण्यास तीव्र विरोध होता. अभिनयाचा वारसा असूनही त्याच्या कुटुंबियांना वाटायचे की, आमिरने चांगले शिक्षण घेऊन एक चांगली सरकारी नोकरी करावी. आमिरचे वडील ताहिर हुसैन यांनी कित्येक चित्रपटात पैसे अडकवले होते, मात्र ते चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांच्यावर कर्ज झाले होते. यासाठी त्यांना असे वाटायचे की, आमिरने असे काही काम करावे ज्यात सिक्यूरिटी असेल.

* सुशांत सिंह राजपूत
'काई पो छे' आणि 'एम.एस.धोनी' सारख्या चित्रपटात काम करणारा सुशांत सिंह राजपूत कॉलेजमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. जेव्हा त्याला अॅक्टर बनण्याचे वाटू लागले की, तेव्हा त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून दिले. मात्र त्याच्या या निर्णयाने त्याचे पॅरेंट्स खूपच नाराज झाले आणि त्यांची इच्छा नव्हती की, सुशांतने अॅक्टिंगमध्ये करिअर करावे.

* करिश्मा कपूर
बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या अभिनय क्षेत्राचा वारसा लाभलेल्या करिश्माचे स्ट्रगल खूपच वेगळे होते. कपूर खानदानच्या प्रत्येक पिढीमधून कोणी ना कोणी बॉलिवूडचा सुपरस्टार बनला आहे. मात्र या परिवारातील कोणत्याही मुलीने चित्रपटात काम केले नव्हते. मात्र करिश्मा कपूरची चित्रपटात काम करण्याची खूपच इच्छा होती, आणि तिने तिचे वडील रणधीर कपूर यांना याबाबत सांगितले तर ते खूपच रागावले होते. पण त्यांच्या विरोधास न जुमानता करिश्माने आपल्या स्वप्नपुर्तीसाठी चित्रपटात पदार्पण केले.