'मला कधीच संसार मोडायचा नव्हता...' सलीम खान यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या हेलन?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 04:07 PM2023-11-21T16:07:56+5:302023-11-21T16:08:55+5:30

जेव्हा मी सलीमसोबत कारमध्ये बांद्रा बँडस्टँडवरील घरासमोरुन जायचे तेव्हा...

bollywood dancer Helen celebrating 85 th birthday today once she got emotional while speaking about salim khan first wife | 'मला कधीच संसार मोडायचा नव्हता...' सलीम खान यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या हेलन?

'मला कधीच संसार मोडायचा नव्हता...' सलीम खान यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या हेलन?

ज्येष्ठ लेखक सलीम खान (Salim Khan) यांचं कुटुंब बॉलिवूडमध्ये सर्वात चर्चेतलं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. सलीम खान यांना दोन पत्नी आहेत आणि त्या दोघींसोबतही ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच घरात राहत आहेत. त्यांची दुसरी पत्नी आणि  नृत्यांगना हेलन (Helen) आज ८५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. हेलन यांनी एकदा एका मुलाखतीत सलीम खानचं घर तोडायचं नव्हतं असा खुलासा केला होता. हेलन नक्की काय म्हणाल्या होत्या?

हेलन या बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर आहेत. इंडस्ट्रीत काम करत असतानाच त्यांची ओळख सलीम खान यांच्याशी झाली. सलीम खान यांनी हेलनला अनेक फिल्म मिळवून दिल्या. दरम्यान त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि याचं रुपांतर प्रेमात झालं. एक दिवस सलीम खान यांनी प्रेमाची कबुली दिली तर हेलनही नाही म्हणू शकल्या नाहीत. 

अरबाज खानच्या 'The Invincibles' शोमध्ये हेलन म्हणाल्या, 'मला कधीच सलीम खानचा संसार मोडायचा नव्हता. मला सलमाबद्दल कायमच आदर होता. जेव्हा मी सलीमसोबत कारमध्ये बांद्रा बँडस्टँडवरील घरासमोरुन जायचे तेव्हा मी लपून बसायचे. सलमा बाल्कनीतून मला बघेल का अशी मला भीती वाटायची.'

हेलन पुढे म्हणाल्या,'सलमा खूप चांगली व्यक्ती आहे. तिच्यासाठी पतीचं दुसरं लग्न पाहणं खूपच कठीण गेलं असणार. पण या कुटुंबाने मला मनातून स्वीकारलं आणि कधीच सलीमपासून मला लांब केलं नाही.' हे सांगताना हेलन खूपच भावूक झाल्या होत्या.

Web Title: bollywood dancer Helen celebrating 85 th birthday today once she got emotional while speaking about salim khan first wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.