गुप्त विवाह करणारे बॉलिवूड कपल्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 16:45 IST2017-11-26T11:15:41+5:302017-11-26T16:45:41+5:30
-रवींद्र मोरे अभिनेता कुणाल कपूर विवाहित आहे कळल्यावर अनेकांना धक्का बसला होता. त्याचा विवाह अमिताभ बच्चन यांची पुतणी नयना ...
.jpg)
गुप्त विवाह करणारे बॉलिवूड कपल्स !
अभिनेता कुणाल कपूर विवाहित आहे कळल्यावर अनेकांना धक्का बसला होता. त्याचा विवाह अमिताभ बच्चन यांची पुतणी नयना बच्चनसोबत २०१५ मध्ये गुप्त विवाह झाला होता. या विवाहाला बच्चन आणि कुणालच्या फॅमिलीतील फक्त जवळचे लोक हजर होते. अजूनही कुणाल आणि नयना मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येणे पसंत करीत नाहीत.
बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रेम प्रकरणे हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सिक्रेट मॅरेजीस हा त्याचाच एक भाग आहे. आपल्या प्रसिध्दीला धक्का बसू नये यासाठी लग्न करुन ती लपवणे हा उद्योग बऱ्याच जोडप्यांनी आतापर्यंत केलाय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अशा काही जोडप्यांबद्दलची माहिती घेऊयात.

* जॉन अब्राहम आणि प्रिया रुनछाल
हे कपल नेहमी जीममध्ये भेटायचे. त्याच जीममध्ये बिपाशा बसूदेखील व्यायाम करायची. पण तिच्या हे ध्यानात यायला खूप उशीर झाला. २०१२ मध्ये जेव्हा हे प्रेमप्रकरण बिपाशाला कळले तेव्हा तिच्यात आणि जॉनमध्ये ब्रेकअप झाला. त्यानंतर २०१३ मध्ये प्रिया आणि जॉनचा गुप्त साखरपुडा झाला. पण अद्यापही हे जोडपे खुलेपणाने फिरत नाही.

* राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा
या दोघांचा विवाह खऱ्या अर्थाने गुप्तपणे झाला. त्या अगोदर त्यांचे प्रेम प्रकरणही गुप्तच होते. २०१४ मध्ये राणी आणि आदित्य यांनी इटलीत लग्न केले. अद्यापही त्यांनी एकत्रीत फोटो क्लिक होऊ दिलेला नाही.

* संजय दत्त आणि मान्यता
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत गुप्त प्रेम संबंध राखून त्यांची ह्रदये मोडलेल्या संजय दत्तने अखेर मान्यता दत्तसोबत २००८ मध्ये विवाह केला. हे प्रकरणही त्याने गुप्त ठेवले होते. त्यामुळेच संजय दत्तची बहिणी प्रिया दत्तला ही गोष्ट आवडली नव्हती.

* धर्मेंद्र आणि हेमा मालिनी
या दोघांचाही विवाहदेखील गुप्तपणे पार पडला होता. धर्मेंद्रचे हे दुसरे लग्न होते. हेमा मालिनीसोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्रला पत्नी प्रकाश कौर यांची परवानगी मिळणे शक्य नव्हते. दुसरे म्हणजे त्या घटस्फोटही देणार नव्हत्या. म्हणून धर्मेंद्रने आपला धर्म बदलला आणि विवाह केला. ही गोष्ट जेव्हा पहिल्या पत्नीला कळली तेव्हा तिने नाईलाजाने धर्मेंद्र यांना माफ केले.

* बोनी कपूर आणि श्रीदेवी
या दोघांनी विवाह केल्यानंतर बोनीची पहिली पत्नी मोना कपूरला मोठा धक्का बसला. त्यांना अर्जुन आणि अंशुला ही दोन अपत्ये होती. यामुळे मोना कपूर यांना नैराश्य आले. यातच त्यांचे २०१२ मध्ये निधन झाले.

* मिथून चक्रवर्ती आणि श्रीदेवी
या दोघांतही प्रेम संबंध तयार झाले होते. मिथूनला श्रीदेवीसोबत मनापासून लग्न करायचे होते. पण जोपर्यंत पहिली पत्नी योगिता बालीला घटस्फोट देत नाही तोपर्यंत श्रीदेवी लग्नास तयार होत नव्हती. दरम्यान याच काळात तिचे बोनी कपूरसोबत सूत जुळायला सुरूवात झाली होती.त्यानंतर योगिता बालीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने हादरलेल्या मिथूनदाने श्रीदेवीसोबतचे संबंध संपवले. पण श्रीदेवी आणि मिथून यांनी सिक्रेटली लग्न केल्याची चर्चा त्या काळात फिल्म इंडस्ट्रीत जोरात होती. एका जुन्या मुलाखतीत मिथूनने ही गोष्ट कबूल केली होती.

* सैफ अली खान आणि अमृता सिंग
यांनीही गुप्त विवाह केला होता. अमृताचे वय सैफहून १२ वर्षांनी मोठे असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांचा विवाहाला विरोध होता. म्हणूनच अत्यंत सिक्रेट वातावरणात दोघे बोहल्यावर चढले. काही काळ त्यांनी सुखाचा संसार केला पण टिकू शकला नाही. २००५ मध्ये दोघे विभक्त झाले.