​फसवणुकीचे आरोप असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 20:02 IST2016-06-21T14:32:05+5:302016-06-21T20:02:05+5:30

बॉलिवूड आणि वाद यांचे नाते तसे जुनेच. बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या अभिनयासाठी जितक्या चर्चेत असतातच, तितक्याच वादांसाठीही चर्चेत दिसतात. ताजे ...

Bollywood celebrities charged with cheating .. | ​फसवणुकीचे आरोप असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी..

​फसवणुकीचे आरोप असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी..

ong>बॉलिवूड आणि वाद यांचे नाते तसे जुनेच. बॉलिवूड सेलिब्रिटी त्याच्या अभिनयासाठी जितक्या चर्चेत असतातच, तितक्याच वादांसाठीही चर्चेत दिसतात.
ताजे उदाहरण अभिनेता आर माधवन. ‘तनु वेड्स मनु’सारख्या चर्चित चित्रपटांमधील अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडणाºया आर. माधवनवर अवैधरित्या जमिनीवर कब्जा केल्याचा आरोप  आहे. याप्रकरणी आज मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयाने माधवनला नोटीस बजावली. यामुळे तो वादात सापडला आहे.काल-परवा हृतिक रोशन यांची एक्स-वाईफ सुजैन खान हिच्यावरही फसवणुकीचा आरोप झाला. त्यापूर्वी जूही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्याविरूद्धही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. केवळ आर. माधवन, सुझैन किंवा जुही चावला हेच नाहीत. तर यापूर्वी शिल्पा शेट्टी,श्रुति हसन, राजपाल यादव यांच्यावरही असेच आरोप झालेत. जाणूया फसवणुकीच्या आरोपात अडकलेल्या या बॉलिवूड सेलिब्रिटींबद्दल...

आर.माधवन



जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणी अभिनेता आर. माधवन याला मद्रास उच्च न्यायालयाने नोटीस बजावले आहे. डिंडिगुल जिल्ह्यात माधवनने जमीन खरेदी केली आहे. याच जमिनीला लागून असलेल्या कालव्यावर अवैध कब्जा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी न्यायालयाने आज मंगळवारी माधवनला नोटीस बजावली. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या ११ जुलैला होणार आहे.

सुझैन खान 



अगदी काल-परवा बॉलिवूडस्टार हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात १.८७  कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसात गुन्हा दाखल झाला.  एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मने याबाबत तक्रार केली असून सुझानने आर्किटेक्ट असल्याचं भासवून कंपनीसोबत करार केल्याचं म्हटलं आहे. एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली आहे. सप्टेंबर २०१३ मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केल्याची माहिती समोर आली आहे.  उत्तर गोवातील तिसवाडीमधल्या सिरिदाओत बांधल्या जाणाºया नायरा कॉम्प्लेक्ससाठी हा करार झाला होता. करारात नमूद केलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्यास सुझान अपयशी ठरल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पोलिस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत होते, त्यामुळे आपण कोर्टात धाव घेतली. मात्र त्याचवेळी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला, असंही गुप्तांनी सांगितलं. अर्थात सुझानने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

राजपाल यादव



अलीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेता राजपाल यादव याला येत्या १५ जुलैपर्यंत आत्मसमर्पण करून यापूर्वी त्याला सुनावलेल्या शिक्षेतील उरलेल्या सहा दिवसांची शिक्षा भोगण्याचे निर्देश दिले. २०१३ मध्ये खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याबद्दल राजपालला ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. २०१३ मध्ये दिल्लीचे उद्योगपती एमजी अग्रवाल यांनी पाच कोटींचे कर्ज न फेडल्याबद्दल राजपाल यादव व त्याच्या पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. राजपाल यादवने सन २०१० मध्ये दिग्दर्शनात हात आजमावण्याच्या इराद्याने हे कर्ज घेतले होते.

जुही चावला



आपल्या लोभस हास्यासाठी प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्याविरुद्ध झारखंडची राजधानी रांची येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उबकुल फ्यूटेक या प्रायव्हेट कंपनीस फ्रेंचाइसी दिल्याच्या नावावर आठ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.जूही व तिच्या पतीसोबत २०१३ मध्ये करार केल्याचा दावा उबकुल फ्यूटेकचे डायरेक्टर चौधरी एपी दास व मार्केटींग हेड अपूर्वा यांनी केला आहे.

शिल्पा शेट्टी



गतवर्षी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्यावरही फसवणुकीचा गंभीर आरोप झाला. कोलकात्यातील मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी देबाशीष गुहा यांनी शेट्टीवर ९ कोटी रूपयांनी फसवणूक केल्यावा आरोप केला. शिल्पाची कंपनी ईएसपीएलने दोन वर्षांत दहा पट परतावा देण्याचा दावा करीत आपल्याकडून ९ कोटी रुपए घेतल्याचा गुहा यांचा आरोप होता.

श्रुति हसन



बॉलिवूड अभिनेत्री श्रुति हसन ही सुद्धा गतवर्षी फसवणुकीच्या आरोपांमुळे चर्चेत राहिली. पिक्चर हाऊस मीडिया लिमिटेडने तिच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. एका चित्रपटासाठी श्रुतिने करार केला होता. पण नंतर तिने हा करार नाकारला, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता.

Web Title: Bollywood celebrities charged with cheating ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.