अभिमानच्या रिमेक मध्ये दिसू शकते हे बॉलिवूडमधले कपल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:02 IST2017-10-23T10:32:43+5:302017-10-23T16:02:43+5:30
बॉलिवूडमध्ये चित्रपटांचे रिमेक बनणे ही काय आता नवी गोष्ट राहिलेली नाही. काही चित्रपटाचे रिमेक प्रेक्षकांना आवडतात तर काही फ्लॉप ...

अभिमानच्या रिमेक मध्ये दिसू शकते हे बॉलिवूडमधले कपल
ब लिवूडमध्ये चित्रपटांचे रिमेक बनणे ही काय आता नवी गोष्ट राहिलेली नाही. काही चित्रपटाचे रिमेक प्रेक्षकांना आवडतात तर काही फ्लॉप होतात. 1973 साली आलेला अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा अभिमान हा चित्रपट तर तुम्हाला आठवतच असेल. या जोडीचा हा चित्रपट त्यावेळी सुपरहिट देखील झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार आता असे कळते आहे कि लवकरच या चित्रपटाचा रिमेक बनणार आहे. अभिमान या चित्रपटाच्या रिमेक मध्ये आता कोणी जोडी दिसणार याची उत्सुकता तुम्हाला लागली असले. त्या जोडीच्या नावावरुन सुद्धा पडदा उठला आहे. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चनची जोडी या रिमेकमध्ये दिसण्याची चिन्ह आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाचा रिमेक बनणारा असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. तब्बल 45 वर्षानंतर या चित्रपट रिमेक तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटात जया बच्चन यांचा गायनक्षेतील करिअर ग्राफ हा पतीपेक्षा वर जातो. त्यागोष्टीची चीड अमिताभ यांच्या मनात निर्माण होते. अशी या चित्रपटाची कथा होती. काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्याने या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. अभिषेकच्या म्हणण्यानुसार अशा क्लासिक चित्रपटांना हात लावू नये मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार दोघे या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे. तामिळ छायाचित्रकार-दिग्दर्शक राजीव मेनन यांनी या चित्रपटाचा रिमेक बनवण्याची तयारी दर्शवली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने या चित्रपटात काम करण्यास होकार दिला तर 2010 नंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसणार आहेत.
![]()
ALSO RAED : पाहा, अमिताभ बच्चन यांच्या घरचे लक्ष्मीपूजन! साधेपणाने साजरी केली दिवाळी! !
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन 2010 आलेल्या मणिरत्नम यांच्या 'रावण' या चित्रपटात दिसले होते. ऐश्वर्या राय ओम प्रकाश मेहरा यांच्या 'फन्ने खान'मध्ये दिसणार आहे. 2018च्या एप्रिल महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याचे दिग्दर्शन अतुल मांजरेकर करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल 17 वर्षांनंतर ऐश्वर्या आणि अनिल कपूर एकत्र काम करणार आहे. या ऐश्वर्या राजकुमार रावसोबत रोमांस करताना दिसणार आहे.