आणखीन एका स्टार किडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कोण आहे ही व्यक्ती जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 19:30 IST2019-02-18T19:30:00+5:302019-02-18T19:30:00+5:30
अभिनेता अर्जुन रामपालची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये काम करते आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

आणखीन एका स्टार किडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, कोण आहे ही व्यक्ती जाणून घ्या
बॉलिवूडमधील स्टारकिड्सच्या यादीत आता आणखीन एका स्टार किडची भर पडली आहे. आता अर्जुन रामपालची कन्या मिहीका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तिच्याकडे कोणता सिनेमा आला आहे किंवा ती अन्य कोणत्या प्रोजेक्टवर काम करण्याच्या तयारीत आहे, हे मात्र समजू शकलेले नाही.
अभिनेता अर्जुन रामपालने याबाबत पुरेशी गोपनीयता बाळगली आहे. आपली कन्या नेहमीच बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छिते, असे अर्जुन रामपालने यापूर्वी अनेक वेळा सांगितले होते. तिच्या करिअरसाठी अर्जुनने एखाद्या गॉडफादरला नक्की हाताशी धरले असणार. मात्र त्याचा खुलासा त्याने न केल्यामुळे सध्या याबाबत काहीच अपडेट नाहीत. अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांच्यातील 20 वर्षांपासूनचे वैवाहिक आयुष्य गेल्या वर्षीच समाप्त झाले आहे.
घटस्फोट झाल्यानंतर अर्जुन आणि त्याच्या मुलीमधील बॉडिंग आणखीनच वाढले आहे. तो अजूनही आपल्या मुलींना नियमितपणे भेटत असतो. यापूर्वी त्याला पलटणमध्ये बघितले गेले होते. त्याच्या करिअरबरोबर त्याच्या मुलींच्या करिअरचा ग्राफही आता अधिक लक्षवेधी ठरणार आहे.
अर्जुन कपूर सोशल मीडियावर खूप सक्रीय असतो. यापूर्वी देखील त्याने आपल्या मुलीसोबत बरेच पोस्ट शेअर केले आहेत. तिच्या वाढदिवसादिवशी अर्जुनने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि लिहिले होते की, महिका माझे एक्सटेंशन आहे आणि माझा अभिमान, प्रेम व आनंद आहे.