बॉलीवूड आणि हरियाणाचे कलाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 07:25 IST2016-03-08T09:17:53+5:302016-03-08T07:25:31+5:30
हरियाणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक हिंसक घटनांनी रणदीप हुड्डा दु:खी झाला आहे. हुड्डा रोहतक येथील रहिवासी असून, संपूर्ण जिल्ह्यात हिंसा ...

बॉलीवूड आणि हरियाणाचे कलाकार
ह ियाणामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक हिंसक घटनांनी रणदीप हुड्डा दु:खी झाला आहे. हुड्डा रोहतक येथील रहिवासी असून, संपूर्ण जिल्ह्यात हिंसा उफाळली होती. हुड्डा या घटनेला आपल्या जीवनातील काळा दिवस मानतो. या घटनेमुळे बसलेल्या धक्क्यातून बाहेर पडण्यास वेळ लागणार असल्याचे तो म्हतो. रोहतक येथे लवकरच जाण्याचे संकेत हुड्डाने दिले आहेत. हरिणायामधील लोक शांत असून, तेथून आलेल्या कलाकारांनी हिंदी चित्रपटात आपले नाव कमावल्याचे, रणदीप म्हणाला.
हरियाणा आणि बॉलीवूड यांच्यातील संबंध निकटचे आहेत. सुनील दत्तपासून रणबीर हुड्डापर्यंत अनेकांनी हरियाणाहून येत मुंबईत बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावले आहे. सुनील दत्त यांचा जन्म कुरुक्षेत्र जिल्ह्यातील यमुनानगरमधील मंडोली गावात झाला होता. रोहतकचे नाव चमकविण्यात रणदीप हुड्डासमवेत मल्लिका शेरावत हिचाही वाटा आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी मल्लिकाचे शिक्षण रोहतक येथेच झाले होते.
अंबाला जिल्हा देखील मागे नाही. या जिल्ह्यातून ओम पुरी, जुही चावला आणि परिणिती चोप्रा आहेत, ज्यांनी बॉलीवूडमध्ये यश मिळविले आहे. जुही चावलाचा जन्म अंबालामध्ये झाला होता. परिणीती अंबालामध्ये वाढली. दिल्लीला नाट्यक्षेत्रात जाण्यापूर्वी ती अंबाला येथे होती. त्याच ठिकाणी तिचा जन्म झाला. नुकताच अलीगढ चित्रपटात पत्रकार बनलेला राजकुमार राव (ज्याचे आडनाव पूर्वी यादव होते) याचा जन्म गुडगाव येथे झाला होता. रोहतकमधील खरखरा गावातून आलेल्या जयदीप अलहावतने रामगोपाल वर्मापासून रोहित शेट्टीपर्यंतच्या चित्रपटात काम केले आहे. अब तक ५६ आणि गंगाजलसह अनेक चित्रपटात काम केलेले यशपाल शर्मा हे हरियाणाच्या हिंस्सार येथील आहेत. टेलिव्हिजन अभिनेता यश टोंक हिस्सार येथील आहे. टेलिव्हिजन कलाकार सृष्टी राणा फरीदाबादमध्ये जन्मली आहे.