"लग्नाच्या २० वर्षानंतरही तो मला..." ट्विकल खन्नाची पती अक्षय कुमारसोबत रोमॅंटिक नाईट डेट; इंस्टा स्टोरीने वेधलं लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 04:59 PM2024-04-03T16:59:47+5:302024-04-03T17:03:10+5:30

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे.

bollywood actress twinkle khanna share story on her night date with husband akshay kumar | "लग्नाच्या २० वर्षानंतरही तो मला..." ट्विकल खन्नाची पती अक्षय कुमारसोबत रोमॅंटिक नाईट डेट; इंस्टा स्टोरीने वेधलं लक्ष 

"लग्नाच्या २० वर्षानंतरही तो मला..." ट्विकल खन्नाची पती अक्षय कुमारसोबत रोमॅंटिक नाईट डेट; इंस्टा स्टोरीने वेधलं लक्ष 

Twinkle Khanna Story : अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. लग्न होऊन बरीच वर्ष उलटली तरीही या दोघांमधील प्रेम टिकून आहे. अक्षय आणि ट्विंकल हे दोघेही सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात सक्रिय आहेत. दोघांची फॅन फॉलोईंगही प्रचंड आहे.

नुकतीच ट्विंकल खन्नाने सोशल मीडियावर पती अक्षय कुमारसोबतच्या डेट नाईटची एक स्टोरी  शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये त्या दोघांचा एक फोटो तिने पोस्ट केलाय. या स्टोरीमध्ये  त्यांच्या संपुर्ण नाईट डेटची झलक पाहायला मिळत आहे. 
 
ट्विंकलनं स्टोरीला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, ''After 2 decade he still makes me laugh on a date night''. त्यामुळे सोशल मीडियावर ट्विंकलच्या स्टोरीची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सध्या खिलाडी कुमार टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.  हा चित्रपट ईदच्या दिवशी म्हणजेच येत्या १० एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी अक्षय कुमार व्यस्त आहे.

Web Title: bollywood actress twinkle khanna share story on her night date with husband akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.