बॉलिवूडच्या ‘या' अभिनेत्रीवर कधी काळी सुनील शेट्टीचं होतं जीवापाड प्रेम?जाणून घ्या कोण आहे 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 10:46 IST2017-09-16T05:16:58+5:302017-09-16T10:46:58+5:30

बॉलिवूडचा अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टी यानं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.31 वर्षांपूर्वी सुनील शेट्टीनं बॉलिवूडमध्ये पाऊल ...

Bollywood actress Sunil Shetty was in love with Jeevapad? | बॉलिवूडच्या ‘या' अभिनेत्रीवर कधी काळी सुनील शेट्टीचं होतं जीवापाड प्रेम?जाणून घ्या कोण आहे 'ती'

बॉलिवूडच्या ‘या' अभिनेत्रीवर कधी काळी सुनील शेट्टीचं होतं जीवापाड प्रेम?जाणून घ्या कोण आहे 'ती'

लिवूडचा अण्णा म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सुनील शेट्टी यानं नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.31 वर्षांपूर्वी सुनील शेट्टीनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी सुनील शेट्टी पुन्हा एकदा चर्चेत आला. 'इंडियाज असली चॅम्पियन' या कार्यक्रमातील त्याच्या उपस्थितीमुळे जोरदार चर्चा रंगली. या कार्यक्रमावेळी त्याचा लूक आणि पर्सनालिटी पाहून त्याच्या वयाचा कुणालाही अंदाज येणार नाही. सुनील सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही. मात्र मुलांसह फोटोंमुळे तो चर्चेत राहतो. छंद म्हणून सुनील शेट्टीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याआधी त्याच्याकडे हॉटेल व्यवस्थापनची पदवी होती. आपल्या कुटुंबाबाबत सुनील शेट्टी फारच पसेसिव्ह असल्याचे बोललं जातं. मात्र बॉलिवूड सिनेमात काम करता करता बॉलिवूडचा हा अण्णा आपल्या एका सह अभिनेत्रीवर फिदा झाला होता. 



तिच्या प्रेमात तो आकांत बुडाला होता असं सांगितलं जातं. जिच्यावर सुनीलचं प्रेम जडलं होतं त्या अभिनेत्रीनं सुनीलसह ब-याच सिनेमात एकत्र काम केलं होतं. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री सोनाली बेंद्रे आहे. सोनाली बेंद्रेवर बॉलिवूडचा अण्णा सुनील शेट्टी भलताच लट्टू झाला होता. सिनेमात सुनील आणि सोनाली अनेकदा रोमान्स करताना दिसले. दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर चांगलीच रंगली. मात्र प्रत्यक्ष जीवनात सुनील आपल्या मनातली प्रेमाची गोष्ट सोनालीपुढे कधीच व्यक्त करु शकला नाही.सुनीलचं सोनालीवर जीवापाड प्रेम होतं असंही सांगितलं जातं. 




केवळ सुनीलच नाही तर सोनालीलाही बॉलिवूडचा हा अण्णा भावला होता. मात्र सुनील शेट्टीनं ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं, त्याआधीच तो लग्नबंधनात अडकला होता. सुनीलचं सोनालीवर इतकं प्रेम होतं की तो विवाहित नसता तर त्याने सोनालीशी लग्न केलं असतं ही बाब सुनीलचा खास मित्र आणि अभिनेता गोविंदानं सांगितली आहे.सुनील शेट्टी बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अपवादानेच पाहायला मिळतो. त्याला फिश करी, थाय फूड आणि कुल्फी खायला आवडते. अभिनय कारकिर्दीसह सुनील शेट्टीचा हॉटेल व्यवसायसुद्धा आहे. तो एका बुटीकचा मालकही आहे. सुनील शेट्टीची मुलंही आता हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झालीत. अर्जुन कपूरच्या 'मुबारकाँ' या सिनेमात नुकतंच सुनीलच्या मोठ्या मुलीनं अथियाने काम केलं होतं. तर त्याचा लहान मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.
 

Web Title: Bollywood actress Sunil Shetty was in love with Jeevapad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.