रजा मुराद यांची भाची, १७ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकावर जडला जीव; लग्नासाठी धर्मांतर करुन देश सोडला पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:40 IST2025-09-18T16:34:40+5:302025-09-18T16:40:17+5:30
१७ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकावर जडला जीव; लग्नासाठी धर्मांतर करुन देश सोडला पण घडलं भलतंच!

रजा मुराद यांची भाची, १७ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकावर जडला जीव; लग्नासाठी धर्मांतर करुन देश सोडला पण...
Bollywood Actress: हिंदी चित्रपटसृष्टी केव्हा कोणाचे नशीब उजळेल वा कोणाला कधी अंधारात लोटेल याचा कधीही अंदाज येत नाही.नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगून दररोज असंख्य तरुण-तरुणी स्वप्ननगरी मुंबईत येत असतात. काहींना यश मिळतं, तर काही अपयशी होऊन घरी परत जातात. आपल्या निखळ सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या हृदयाचे तार छेडणारी ही अभिनेत्री म्हणजे बख्तावर मुराद खान. या अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य तिच्या चित्रपटांपेक्षा जास्त चर्चेत राहिलं. सौंदर्यात भल्याभल्या नायिकांना मात देणाऱ्या या अभिनेत्रीन ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या कलाकारांबरोबर काम केलं. तर कोण आहे ही अभिनेत्री जाणून घेऊया...
बख्तावर मुराद खान हे अभिनेत्री सोनम खानचं खरं नाव आहे. १९८८ मध्ये या तरुणीने असेच आपले नशीब आजमावण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सोनमच्या सिनेमात काही गाणी, एखाद-दोन बोल्ड आणि इमोशनल सीन्स असायचे. ९० च्या दशकात या नायिकचे चित्रपट बघायला प्रेक्षक थिएटरकमध्ये गर्दी करायचे. तिरछी टोपी वाले गाण्यातून प्रसिद्धीझोतात आलेली सोनम खानने खऱ्या आयुष्यात दोन लग्न केली. सोनमचा जन्म २ सप्टेंबर १९७२ रोजी मुंबईत झाला. ती ज्येष्ठ अभिनेते मुराद यांची नात तर अभिनेता रझा मुराद यांची भाची आहे. १९८७ मध्ये रमेश बाबूसोबत 'सम्राट' या तेलगू चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करून चित्रपटसृष्टीतील नायिका म्हणून तिचा प्रवास सुरू झाला. यश चोप्रा यांनीच तिचे बख्तावर मुराद खान हे नाव बदलून तिला सोनम हे नाव दिलं. आपल्या फिल्मी कारिकिर्दीत अभिनेत्रीने आखरी गुलाम , सच्चाई की तकदीर, नाइन्साफी ,अरमान से ऊंचा, त्रिदेव यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र,'मिट्टी और सोना' या चित्रपटामधील तिच्या संवेदनशील अभिनयाचं सर्व स्तरातून कौतुक झालं.
१९ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलं...
प्रसिद्धीच्या शिखरावर असताना या अभिनेत्रीने वयाच्या १९ व्या वर्षी सोनमने १९९१ मध्ये दिग्दर्शक राजीव राय यांच्याशी लग्न केलं. राजीव राय यांनी 'त्रिदेव' आणि 'विश्वात्मा' या चित्रपटांचे दिग्दर्शन केलं होतं. सोनमचे पती वयाने तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठे होते. सोनमच्या या लग्नाला तिच्या कुटुंबीयांसह अनेकांचा विरोध होता. मात्र, तिने कोणाचेही न ऐकलं नाही. लग्नानंतर सोनमने हिंदू धर्म स्वीकारल्याचंही सांगण्यात येतं. तिला एक मुलगा देखील आहे. २००१ मध्ये ती आणि तिचा पती वेगळे झाले, अखेरीस त्यांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेत आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.