बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'नशीबानं मी...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 07:00 IST2021-11-28T07:00:00+5:302021-11-28T07:00:00+5:30
रेखा यांच्याविषयी ही एक गोष्ट अनेकांना माहित नाही आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा धक्कादायक खुलासा, म्हणाल्या - 'नशीबानं मी...'
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बॉलिवूड दिवा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते अशा अभिनेत्री म्हणजे रेखा. बॉलिवूड दिवा आणि अनेकांच्या दिलों की धडकन अशी त्यांची ओळख. 'पहेली है ये जिंदगानी' म्हणत त्यांनी तरुण पिढीला अक्षरशः क्लीन बोल्ड केले होते. आजच्या पिढीलाही रेखा यांच्यासह काम करावे असे वाटते. मात्र रेखा यांच्याविषयी एक गोष्ट आहे जी अनेकांना माहिती नसावी. ती म्हणजे,चित्रपटसृष्टीला 'मिस्टर नटवरलाल', 'उमराव जान' और 'सिलसिला' असे एक से बढकर एक सिनेमा देणाऱ्या रेखा यांना मात्र कधीच अभिनेत्री बनायचे नव्हते.
आज जेव्हा अभिनेत्री रेखा मागे वळून पाहतात तेव्हा मात्र अभिनयाला करिअर बनवल्यामुळे त्या आज खूप खूश आहेत. या अभिनयामुळे आणि सिनेइंडस्ट्रीमुळे रेखा यांना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे असंख्य चाहते रेखा यांना मिळाले. 'खून भरी मांग' हा सिनेमा करतेवेळी रेखा यांना त्यांचा अभिनेत्री बनण्याचा निर्णय योग्य वाटला. या सिनेमामुळेच आपण यापेक्षा दुसरे चांगले काम करूच शकत नसल्याचे रेखा यांना खऱ्या अर्थाने पटू लागले. चित्रपटसृष्टीत काम करणे हे जणू फक्त त्यांच्यासाठीच होते असे त्यांना वाटू लागले.
'सावन भादो'मधून केले बॉलिवूडमध्ये पदार्पण
ग्लॅमरस, सुंदर नट्यांच्या जगात सावळ्या रंगाच्या असून रेखा यांच्या सौंदर्याच्या जादू काही कमी झाली नाही. आपल्या अभिनयाप्रमाणेच आपल्या सौदर्यांवरही रसिक फिदा झाल्याचे पाहायला मिळाले. रेखा यांनी आपली फिल्मी करीअरची सुरुवात तेलुगु चित्रपट 'रंगुला रत्नम'मधून केली होती. तर 'सावन भादो' सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वयाची पासष्टी उलटलेली असतानाही रेखा यांची प्रत्येक अदा आजही तितकीत घायाळ करणारी आहे.