खरंच ही मलायका आहे का? अभिनेत्रीचा 'हा' जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 12:37 PM2022-01-23T12:37:56+5:302022-01-23T12:38:46+5:30

Malaika Arora: म्हणजे वयाची ४५ वर्ष उलटल्यानंतरही तिचा फिटनेस आणि सौंदर्य तरुणींना लाजवेल असा आहे.

bollywood actress malaika arora throwback photo viral on social media | खरंच ही मलायका आहे का? अभिनेत्रीचा 'हा' जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

खरंच ही मलायका आहे का? अभिनेत्रीचा 'हा' जुना फोटो पाहून ओळखणंही आहे कठीण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (malaika arora) अनेकदा तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. यात अनेकदा तिच्या लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा होतांना दिसते. विशेष म्हणजे वयाची ४५ वर्ष उलटल्यानंतरही तिचा फिटनेस आणि सौंदर्य तरुणींना लाजवेल असा आहे. आज मलायका कलाविश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु, एकेकाळी मलायका प्रचंड नॉन ग्लॅमरस दिसायची. सध्या सोशल मीडियावर तिचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिचा लूक पाहिल्यानंतर तिला ओळखणंही कठीण असल्याचं दिसून येतं. 

सोशल मीडियावर सक्रीय असलेली मलायका अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. परंतु, यावेळी तिने शेअर केलेला फोटो पाहून अनेक जण थक्क झाले आहेत. या फोटोमध्ये मलायका नॉन ग्लॅमरस दिसत असून सर्वसामान्य मुलीप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सध्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. 

मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने then and now असे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती तिच्या आई आणि बहिणीसोबत दिसून येत आहे. या फोटोमधील एका जुन्या फोटोंत तिने पिंक रंगाचा टॉप परिधान केला आहे. हा फोटो पाहिल्यावर खरंच ही मलायका आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, मलायका सध्या तिच्या ग्लॅमरस लूक सोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. या दोघांनीही जाहीरपणे त्यांचं नातं मान्य केलं असून अनेकदा या जोडीला एकत्र स्पॉट करण्यात येतं.
 

Web Title: bollywood actress malaika arora throwback photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.