बॉलिवूडमधील ही अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2017 11:44 IST2017-11-11T06:14:48+5:302017-11-11T11:44:48+5:30

सध्या बॉलिवूड असो किंवा छोट्या पडद्या असो सगळीकडेच लगीन सराई सुरु आहे. अनेक कलाकार एकामागो मागएक विवाह बंधनात अडकताना दिसतायेत.

Bollywood actress gets arrested for marrying | बॉलिवूडमधील ही अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत

बॉलिवूडमधील ही अभिनेत्री अडकणार लग्नाच्या बेडीत

्या बॉलिवूड असो किंवा छोट्या पडद्या असो सगळीकडेच लगीन सराई सुरु आहे. अनेक कलाकार एकामागो मागएक विवाह बंधनात अडकताना दिसतायेत. लवकरच आणखीन एक बॉलिवूड अभिनेत्रीच्या घरी सनाई चौघडे वाजणार आहेत. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून आयशा चित्रपटातील अमृता पुरी आहे. अमृता आज तिचा बॉयफ्रेंड इमरून सेठीशी लग्न करणार आहे. अमृताचे लग्न बँकॉक मध्ये होणार असल्याचे कळतेय. लग्नाच्या तयारीसाठी अमृता आणि तिचे कुटुंब तसेच मित्र परिवार काही दिवसांपूर्वीच बँकॉकमध्ये दाखल झाले आहेत. अमृता ‘पी.ओ.डब्ल्यू – बंदी युद्ध के’ मालिकेत शेवटची झळकलेली होती.  गेल्या अनेक वर्षांपासून अमृता आणि इमरून रिलेशनशीपमध्ये आहेत.  इमरून सेठीला हा हॉटेलियर आहे. दोघांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. 

 
अमृताने आपल्या करिअरची सुरुवात थिएटरपासून केली आहे. आयशा चित्रपटात सोनम कपूरच्या मैत्रिणीची भूमिका तिने साकारली होती. जिचे नाव शेफाली होते. यानंतर तिने ‘काय पो छे’मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीची भूमिका साकारली होती. श्रीदेवीच्या मॉम चित्रपटातही अमृता दिसली होती. तसेच ‘पी.ओ.डब्ल्यू – बंदी युद्ध के’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री घेतली होती. यात तिने हरलीन कौर नावाची भूमिका साकारली होती. यात तिने सैनिकाच्या पत्नीची भूमिका साकारली होती.या मालिकेचे शूटिंग केल्यानंतर ती काही दिवस डिप्रेशनमध्ये गेली होती. ही भूमिका साकारणं तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते असे अमृताने सांगितले होते. या मालिकेतील काही भावनिक दृश्यांचे चित्रीकरण केल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली होती. जवळजवळ एक आठवडा तरी डिप्रेशनमध्ये होती.  पी.ओ.डब्ल्यूतील तिची टीम संध्या मृदुल, सत्यदीप शर्मा, आयशा चोप्रा आणि इतरही काही कलाकारांनी तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्वतः अमृताही तिच्या आयुष्यातील हे खास क्षण तिच्या फॅन्ससोबत इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. एका फोटोत तिच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसते. आता अमृतानंतर बॉलिवूडची कोणती अभिनेत्री लग्नाच्या बेडीत अ़डकते ते बघूया. 

 
 
 

Web Title: Bollywood actress gets arrested for marrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.