'पिया बावरी...' मीनाक्षी शेषाद्री यांच्या नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ; आशिष पाटीलनेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:54 PM2024-06-24T15:54:56+5:302024-06-24T15:58:55+5:30

सध्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी लावणी किंग आशिष पाटीलसोबत भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

bollywood actress damini fame meenakshi sheshadri dancing with lavani dancer ashish patil video goes viral  | 'पिया बावरी...' मीनाक्षी शेषाद्री यांच्या नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ; आशिष पाटीलनेही दिली साथ

'पिया बावरी...' मीनाक्षी शेषाद्री यांच्या नृत्य मुद्रांनी चाहते घायाळ; आशिष पाटीलनेही दिली साथ

Meenakshi Seshadri Dance Video : जवळपास ८० च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. मिस इंडियाचा किताब जिंकणाऱ्या मीनाक्षी त्या वेळेस सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानावर होत्या. सध्या अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी लावणी किंग आशिष पाटीलसोबत भरतनाट्यम हे शास्त्रीय नृत्य सादर करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मीनाक्षी यांनी स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करत नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. आशिष पाटील आणि मीनाक्षी यांच्या घायाळ करणाऱ्या नृत्य मुद्रांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे. 

मीनाक्षी शेषाद्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच अभिनेत्रीने इंटरनेटवर भरतनाट्यम करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मीनाक्षी शेषाद्री यांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांच तोंडभरून कौतुक केलं आहे. सोबत आशिष पाटीलने साथ देत नृत्य सादरीकरणाला चार चॉंद लावले आहेत. आशिष पाटीलच्या नव्या कलांगण डान्स स्टुडिओमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या तसेच आशिष पाटीलच्या डान्सिंग स्टेप्स पाहून चाहत्यांच्या नजर खिळल्या आहेत. यावेळी मीनाक्षी यांनी पांढरी सिल्क साडी तसेच गळ्यात तन्मणी हार आणि गोल्डन टेम्पल ज्वेलरी परिधान केली आहे. यासोबत त्यांनी आपल्या केसांमध्ये गजरा माळला आहे.  या लूकमध्ये त्या प्रचंड सुंदर दिसत आहेत.

या व्हिडिओवर कॅप्शन देत, आशिष पाटील म्हणतो," मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो कारण मला सौंदर्यवती मीनाक्षी शेषाद्री यांच्यासोबत नृत्य करण्याची संधी मिळाली. खरोखर ही देवाची कृपा आहे."

पुढे लावणी किंग आशिष पाटीलने लिहलंय," मी याआधी फक्त तुमचं नृत्य कौशल्य रूपेरी पडद्यावर पाहिलं होतं. नृत्यदिग्दर्शन तसेच तुमच्यासोबत स्टेज शेअर करताना मी स्वत: ला खूप नशीबवान समजतो, मॅम फक्त तुमची  नृत्यशैलीच नाही तर एक माणुस म्हणूनही तुम्ही तितक्याच सुंदर आहात".

Web Title: bollywood actress damini fame meenakshi sheshadri dancing with lavani dancer ashish patil video goes viral 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.