रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील आर माधवनचा फर्स्ट लूक आऊट, पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 17:33 IST2025-11-09T17:33:08+5:302025-11-09T17:33:29+5:30
आर माधवनचा 'धुरंधर' सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. '

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमातील आर माधवनचा फर्स्ट लूक आऊट, पहिल्यांदाच दिसणार वेगळ्या भूमिकेत
रणवीर सिंग त्याच्या आगामी 'धुरंधर' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतंच सिनेमातील अर्जुन रामपालचा लूक रिलीज झाला. आता आर माधवनचा सिनेमातील फर्स्ट लूक समोर आला आहे. रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केलं आहे. 'धुरंधर' सिनेमात आर माधवन पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
'कर्म का साथी' असं कॅप्शन देत रणवीरने आर माधवनचा हा लूक शेअर केला आहे. ब्लेझर आणि चष्मा घातलेला माधवन हा गंभीर लूकमध्ये दिसत आहे. त्याच्या डोक्यावरचे केसही विरळ झालेले दिसत आहेत. आर माधवनचा हा लूक पाहून चाहत्यांच्या 'धुरंधर' बाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. या पोस्टरवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. लवकरच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टायटल ट्रॅक रिलीज करण्यात आला होता. ज्यामध्ये रणवीर सिंगचा दमदार लूक आणि उत्साह पाहण्यासारखा होता. जुलैमध्ये आलेल्या चित्रपटाच्या टीझरमध्ये संपूर्ण स्टारकास्टची झलक दाखवण्यात आली होती. या स्पाय थ्रिलर अॅक्शन चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. 'धुरंधर' ५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.