राजकारणात प्रवेश करणार? इंडिया आघाडी की भाजपा महायुती? मनोज वाजपेयीने दिलं 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 04:51 PM2024-01-05T16:51:58+5:302024-01-05T16:54:52+5:30

मनोज वाजपेयीने लालू प्रसाद यादवांची भेट घेतल्याने रंगली चर्चा

Bollywood Actor Manoj Bajpayee about political entry by INDIA Opposition Alliance | राजकारणात प्रवेश करणार? इंडिया आघाडी की भाजपा महायुती? मनोज वाजपेयीने दिलं 'हे' उत्तर

राजकारणात प्रवेश करणार? इंडिया आघाडी की भाजपा महायुती? मनोज वाजपेयीने दिलं 'हे' उत्तर

Manoj Bajpayee politics : 'द फॅमिली मॅन' या वेब सिरीजमधून आणि इतर अनेक बॉलिवूड चित्रपटांतून आपला ठसा उमटवणारा प्रसिद्ध चित्रपट अभिनेता मनोज वाजपेयी राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत मनोज वाजपेयी इंडिया अलायन्सचे उमेदवार असतील का? अशा चर्चांना उधाण आले आहे. याचदरम्यान मनोज वाजपेयीने या प्रश्नांवर मौन सोडले आहे. या प्रश्नाचे उत्तर मनोज वाजपेयीने सोशल मीडियावर दिले आहे.

मनोज वाजपेयी राजकारणात येण्याची शक्यता असल्याचे बोलले खुद्द त्यानेच तूर्तास फेटाळून लावली आहे. या संबंधीच्या चर्चेची पोस्ट त्याने ट्विटवर वर शेअर केली असून, त्यासोबत लिहिले आहे की, 'मला सांगा, हे (अफवा) कोणी सांगितले, तुम्हाला (माझ्याबद्दल) काल रात्री काही स्वप्न पडलं होतं का? बोला, बोला... नक्की काय झालं होतं' अशा मजेशीर पद्धतीने त्याने आपल्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

सप्टेंबर २०२२ मध्ये मनोज वाजपेयीने आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांची बिहारमध्ये भेट घेतली तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या होत्या. मनोज वाजपेयीने सध्या राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे सांगितले. सध्या तरी तो निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या पश्चिम चंपारण लोकसभा मतदारसंघातून तो इंडिया अलायन्सचा उमेदवार असू शकतो, अशी चर्चा सुरु झाली होती. त्याची अभिनय क्षेत्रातील लोकप्रियता पाहता तो निवडणूक लढवून जिंकू शकतो, असेही बोलले जात होते. पण सध्या असा काहीच विचार नसल्याचे त्याच्या ट्विटवरून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Bollywood Actor Manoj Bajpayee about political entry by INDIA Opposition Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.