चित्रपटात काम करण्यासाठी अनिल कपूरने काढली होती मिशी; वाचा यामागचा गमतीदार किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 04:32 PM2024-05-02T16:32:49+5:302024-05-02T16:34:19+5:30

हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूरकडे पाहिलं जातं.

bollywood actor anil kapoor shaved his mustache first time in his career for the film lamhe  | चित्रपटात काम करण्यासाठी अनिल कपूरने काढली होती मिशी; वाचा यामागचा गमतीदार किस्सा!

चित्रपटात काम करण्यासाठी अनिल कपूरने काढली होती मिशी; वाचा यामागचा गमतीदार किस्सा!

Anil Kapoor : हिंदी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूरकडे पाहिलं जातं. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्याने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मनोरंजन विश्वात देखण्या कलाकारांची वर्दळ असताना त्यावेळी आपल्या मिशीवर ताव देत त्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. पुढे हीच मिशी त्याची ओळख बनली. पण एका चित्रपटात काम करता यावं, यासाठी अनिल कपूरने चक्क मिशी कापली होती. काय आहे यामागचा गमतीदार किस्सा, जाणून घेऊया. 

यश चोप्रा यांच्या 'लम्हे' या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अनिल कपूरला त्याची मिशी कापावी लागली होती. पहिल्याच भेटीत अनिलने यश चोप्रा यांना स्पष्ट केलं होतं, कुठल्याही परिस्थितीत मला हा चित्रपट करायचा आहे. परंतु यश यांनी तू या कॅरेक्टरसाठी योग्य नसल्याचं सांगितलं. कारण 'तुझं वय जास्त असून, तु या भूमिकेसाठी मला योग्य वाटत नाही', असे यश यांनी स्पष्ट केलं. पण अभिनेत्याला या सिनेमात काम करण्याची प्रचंड इच्छा होती.

या चित्रपटात काम करण्यासाठी यश चोप्रा यांनी अनिल कपूरसमोर एक अट ठेवल्याचं सांगितलं जातं. त्यासाठी अनिल कपूर या चित्रपटात वयाने कमी वाटावा याकरिता त्याला त्याची मिशा कापायला सांगितली होती. मिशी नसलेला अनिल बघून सगळ्यांनाच धक्का बसला. परंतु, अनिलचा हा लुक प्रेक्षकांना देखील खूप भावला.

अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ते सुपरहिट ठरलेल्या 'ॲनिमल' या सिनेमात झळकले होते. या सिनेमात त्यांनी केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं. यासोबत 'फायटर' सिनेमातूनही अनिल कपूर प्रेक्षकांच्या भेटीला आले. लवकरच अनिल कपूर 'वेलकम टु द जंगल' या चित्रपटात झळकणार आहे. अनिल अजूनही पूर्वीसारखे हॅण्डसम आणि चार्मिंग दिसतात.  त्यांचा 'झक्कास' अंदाज प्रत्येकाला आवडतो.

Web Title: bollywood actor anil kapoor shaved his mustache first time in his career for the film lamhe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.