'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल दिसणार 'आश्रम 4'मध्ये; जाणून घ्या कधी येणार पुढचा सीझन...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 05:02 PM2023-12-04T17:02:22+5:302023-12-04T17:08:45+5:30

'आश्रम' या वेबसिरीजचे तीनही सीझन हिट ठरले. त्यानंतर चाहते 'आश्रम 4' ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Bobby Deol in Aashram Season 4 | 'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल दिसणार 'आश्रम 4'मध्ये; जाणून घ्या कधी येणार पुढचा सीझन...

'अ‍ॅनिमल' नंतर बॉबी देओल दिसणार 'आश्रम 4'मध्ये; जाणून घ्या कधी येणार पुढचा सीझन...

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. बॉबी देओल हा सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल'  या सिनेमामुळे चर्चेत आहे. या  चित्रपटात साकारलेली भूमिका आता प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. त्यासाठी चाहते बॉबीचं कौतुक करत आहेत. 

सोशल मीडियावर चाहते बॉबीला 'लॉर्ड बॉबी देओल' म्हणून संबोधत आहेत. बॉबीच्या कारकिर्दीत नकारात्मक पात्रांनी त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. यातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखा बाबा निराला आहे. जी बॉबीने आश्रम सीरिजमध्ये साकारली होती. या सीरिजचे तीन सीझन आले आहेत आणि आता चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पुढच्या वर्षी सीझन 4 प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा सुरू आहे.  'आश्रम सीझन 4' ची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण लवकरच त्याची रिलीज डेट जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. 

गेल्यावर्षी आश्रम सीरिजच्या सीझन 4 चा टीझर रिलीज झाला होता. या 1 मिनिटाच्या टीझरमध्ये बॉबी देओल स्वतःला देव म्हणवताना दिसत आहे. एवढेच नाही तर पोलिसही त्यांच्या मागावर आहेत. मात्र आश्रम 4 मध्ये बाबा निराला पोलिसांच्या हाती लागतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. बॉबी देओल, चंदन रॉय, अदिती पोहनकर, तुषार पांडे, दर्शन कुमार, त्रिधा चौधरी आणि अनुप्रिया गोएंका यांसारखे अनेक सुपरस्टार आश्रम 4 वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
 

Web Title: Bobby Deol in Aashram Season 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.