Aashram 3 Trailer : मैं मैं हूं..., पूरी तरह भयमुक्त..., बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’चा ट्रेलर पाहिलातं का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 14:56 IST2022-05-13T14:56:01+5:302022-05-13T14:56:37+5:30
Aashram 3 Trailer Release: बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली.आता या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, ‘आश्रम 3’ची रिलीज डेट कधीच जाहिर झाली आहे आणि आता याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

Aashram 3 Trailer : मैं मैं हूं..., पूरी तरह भयमुक्त..., बॉबी देओलच्या ‘आश्रम 3’चा ट्रेलर पाहिलातं का?
Aashram 3 Trailer Release: बॉबी देओलची (Bobby Deol) ‘आश्रम’ ही वेबसीरिज प्रचंड गाजली. पहिला सीझन हिट झाल्यावर या सीरिजचा दुसरा सीझन आला. त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता या सीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. होय, ‘आश्रम 3’ची (Aashram 3) रिलीज डेट कधीच जाहिर झाली आहे आणि आता याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.
2 मिनिटं 18 सेकंदाचा ट्रेलर दमदार आहे. यात बाबा निराला एकदम वेगळ्या आणि आधीपेक्षा अधिक आक्रमक अंदाजात दिसतो. तो स्वत:ला देव समजू लागला आहे. राजकारणात त्याचा दबदबा आहे. संपूर्ण शहर त्याचं गुणगान करतंय. पण यावेळी पम्मीला बाबा निरालाला संपवायचं आहे.
ट्रेलरमध्ये पम्मी बाबा निरालवर बंदुक रोखताना दिसते. ती गोळी झाडते. पण ही गोळी बाबाचा अंत करते की नाही, हे तर सीरिज पाहिल्यानंतरच कळणार आहे. बाबाचा चॅप्टर संपणार की तो भोळ्या भाबड्या आणखी भुलवणार? या प्रश्नाचं उत्तरही हा सीझन देणार आहे.
ईशा गुप्ताचा बोल्ड अवतार
आश्रमच्या याआधीच्या सीझनमध्ये बबीता भाभी अर्थात त्रिधा चौधरीचा बोल्ड अवतार पाहायला मिळाला होता. यावेळी ईशा गुप्ताची एन्ट्री झाली आहे. ट्रेलरमध्ये तिची बोल्ड झलक पाहायला मिळते.
प्रकाश झा दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये बॉबी देओल, अदिति पोहनकर, चंदन रॉय सान्याल, दर्शन कुमार, अनुप्रिया गोयनका, ईशा गुप्ता, सचिन श्रॉफ, अध्ययन सुमन, त्रिधा चौधरी, विक्रम कोचर, अनुरिता के झा, रुशाद राणा, तन्मय रंजन, प्रीति सूद, राजीव सिद्धार्थ आणि जया सील हे कलाकार दिसणार आहेत. ही सीरिज येत्या ३ जून रोजी एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित होणार आहे.