...म्हणून पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 03:12 PM2023-12-03T15:12:50+5:302023-12-03T15:17:15+5:30

सोशल मीडियावर बॉबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी हा ढसाढसा रडताना दिसत आहे.

Bobby Deol cried in front of the paparazzi, video viral | ...म्हणून पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल

...म्हणून पापाराझींसमोरच ढसाढसा रडला बॉबी देओल, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. बॉबी देओल हा सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल'  या सिनेमामुळे चर्चेत आहे. या  चित्रपटात साकारलेली भूमिका आता प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चेत आहे. त्यासाठी चाहते बॉबीचं कौतुक करत आहेत. अशातच सोशल मीडियावर बॉबीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉबी हा ढसाढसा रडताना दिसत आहे.

1 डिसेंबरला रिलीज झालेल्या 'अ‍ॅनिमल'ने बंपर कमाई करून अनेक विक्रम मोडले आहेत. चित्रपटाचे ब्लॉकबस्टर यश पाहून बॉबी देओल भावूक झाला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, बॉबी पापाराझींसमोर हात जोडून सर्व चाहत्यांचे 'अ‍ॅनिमल' चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल बॉबीने आभार मानतो. बॉबी देओल हात जोडून म्हणतो, 'तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चित्रपटाला आणि माझ्या भूमिकेला एवढं प्रेम मिळतंय. असं वाटतंय मी स्वप्न बघतोय'. 

तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दिसते की, पापाराझींना भेटल्यानंतर बॉबी त्याच्या गाडीकडे जायला निघाला. गाडीत बसल्यावर पुन्हा एकदा त्याने सर्वांने आभार मानुन डोळे पुसले. या व्हिडिओवरही चाहत्यांनी लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

बॉबी देओलने आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. यात गुप्त, सोल्जर या सिनेमांचा आवर्जुन उल्लेख केला जातो. परंतु, कालांतराने त्याला काम मिळणं बंद झालं होतं. एका मुलाखतीमध्ये  त्याने त्याच्या हातून सिनेमा कसे निसटत गेले हे सांगितलं. पण, अखेर त्याचे दिवस उजळले आहेत. 'अ‍ॅनिमल'मधील खलनायकाच्या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे.  

Web Title: Bobby Deol cried in front of the paparazzi, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.